August 8, 2025

संभाजी विद्यालयात लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

  • वाशी- ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव (लिंगी) येथील संभाजी विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनांक ०१ ऑगस्ट २०२५ रोजी साजरी करण्यात आली.
    यावेळी डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याद्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वसामान्यांना सहज समजेल अशा ग्रामीण भाषेतून शाहीरी करत त्यांनी आयुष्यभर वंचितांसाठी समाजप्रबोधन केले. जातीव्यवस्था आणि गरीबीमुळे ते शिक्षण घेऊ शकले नाही.मात्र अवघी दीड दिवसाची शाळा शिकलेल्या अण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात मात्र खूप मोठी झेप घेतली. लेखणी आणि प्रतिभेच्या बळावर त्यांनी अनेक पुस्तके लिहीली. सिद्धहस्त कादंबरीकार, लोकशाहीर म्हणून त्यांना समाजात आजही मानाचे स्थान आहे.त्यांच्या ‘फकिरा’ कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ठ कांदबरीचा पुरस्कार मिळालेला आहे.यासोबतच त्यांच्या अनेक कांदबऱ्या प्रसिद्ध आहेत.एवढंच नाही तर त्यांचे साहित्य चौदा भारतीय भाषेमध्ये त्यात इंग्रजी, जर्मन,रशियन अशा अनेक परदेशी भाषेत प्रसिद्ध आहेत. डॉ.अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळी,लोकनाट्यांमधून जनजागृतीचे कार्य केले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अत्यंत मोलाचे योगदान
    लाभले होते. अण्णाभाऊ साठें यांनी आपल्या जीवनकाळात विविधांगी लेखन केले. त्यांनी २१ कथासंग्रह आणि ३० पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. मराठी लोकनाट्य,पोवाडे,लावणी,प्रवास वर्णन,कथा,कविता,गीते इ.क्षेत्रांत त्यांनी सक्षम आणि समृद्ध लेखन केले.त्यांनी सामाजिक परिस्थितीवर आपल्या लेखणीतून प्रकाश टाकण्याचे काम केले.
    त्यांच्या ‘फकीरा’ या कादंबरीला १९६१ सालचा उत्कृष्ट कादंबरी पुरस्कार आहे. गोर गरीब, शेतकरी,शेतमजूर,श्रमिक यांच्या अनुभव जाणून त्यांवर लेखन कार्य के ले आहे.”पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे.” अशी अनेक लेखन कार्य त्यांची प्रसिद्ध आहेत.
    या प्रसंगी मुख्याद्यापकांनी विद्यार्थ्यांना आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्या विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
    यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक सुनिल बावकर,संतोष ढोले, संतोष बोडके,सुहास जगताप, तर शिक्षकेत्तर शिवराम शिंदे,फुरडे एल.आर उपस्थीत होते.
error: Content is protected !!