August 8, 2025

धाराशिव येथे मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी

  • धाराशिव – मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघ शाखा धाराशिवच्या वतीने लोकशाहीर साहित्यसम्राट डॉ.आण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.
    शहरातील आण्णाभाऊ साठे चौकात त्यांच्या प्रतिमेस अरुणभाऊ बनसोडे व विजय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
    या कार्यक्रमाला रमाई फाऊंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज चिलवंत,राजाभाऊ बनसोडे, प्रभाकर बनसोडे,सुनिल बनसोडे, अशोक बनसोडे, राजन माने, पत्रकार प्रभाकर लोंढे,दीपक सरवदे आदी मान्यवर उपस्थित होते.
    या वेळी वक्त्यांनी डॉ.साठे यांच्या कार्याचा गौरव करत सामाजिक समतेसाठी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला.कार्यक्रमाचे संयोजन मागासवर्गीय सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले.
error: Content is protected !!