August 8, 2025

जय भवानी विद्यालय पारा येथे गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्यांचे वाटप उपक्रम

  • पारा – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळाचे संस्थापक अध्यक्ष शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या ९८ जयंतीनिमित्त प्रा.रोहित मोहेकर यांच्या संकल्पनेतून सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.
    या उपक्रमाचा मुख्य उद्देश संस्थेतील गरीब,होतकरू व अनाथ विद्यार्थी-विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून हातभार लावणे हाच होता.
    उपक्रमाचा दुसरा टप्पा दिनांक २९ जुलै २०२५,मंगळवार रोजी जय भवानी विद्यालय,पारा (ता. भूम, जि. धाराशिव) येथे पार पडला. या वेळी वह्यांचे वाटप मुख्याध्यापक एन. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
    कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी जय भवानी विद्यालयाच्यावतीने प्रा. रोहित मोहेकर आणि मोहेकर कुटुंबीयांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आणि त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक सेवाभावाचे विशेष कौतुक करण्यात आले.
error: Content is protected !!