August 8, 2025

उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर सुरू – डॉ.धर्माधिकारी

  • कळंब- येथील उपजिल्हा रूग्णालयात सोनोग्राफी सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून त्याचे रीतसर उद्घाटन आमदार कैलास (दादा) पाटील यांचे प्रतिनिधी व रूग्ण कल्याण समिती सदस्य गोविंद चौधरी यांचे हस्ते व उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागनाथ धर्माधिकारी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.सय्यद,रूग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. रामकृष्ण लोंढे,वैद्यकीय अधिकारी तथा स्त्री रोग तज्ञ डॉ.सायस केंद्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पुरूषोत्तम पाटील,सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ गायकवाड,दत्तप्रसाद हेड्डा,व्ही.जे.पवार,स्टाफ यांचे उपस्थितीत करण्यात आले.
    सद्या हे सोनोग्राफी सेंटर प्रत्येक बुधवारी फक्त गरोदर मातांची तपासणी करण्यासाठी चालू राहणार असून गरजेप्रमाणे त्याची व्याप्ती वाढवली जाणार आहे असे डॉ.धर्माधिकारी यांनी सांगितले.
    ही सुविधा उपलब्ध करून द्यावी या साठी रूग्ण कल्याण समिती सदस्य,शहरातील नागरीक व पत्रकार बंधू यांनी मागणी लाऊन धरली होती.शेवटी त्या मागणीस यश आले असून सर्व स्तरातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.तसेच भविष्यात अशा प्रकारच्या सुविधा लवकरच वाढविल्या जातील असे डॉ. धर्माधिकारी यांनी सांगितले.
error: Content is protected !!