येरमाळा – ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दि. १० जुलै २०२५ वार गुरूवार रोजी ज्ञानोद्योग विद्यालयात गुरू पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजीच्या प्रतिमेस पुष्पहार व प्रतिमा पुजन प्राचार्य सुनिल पाटील यांनी केले. यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन गुरूचा महिमा वर्णन केला.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुनिल पाटील हे होते,तर सुञसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख दिलीप मोरे यांनी केले,यावेळी डाॅ.अमर बारकुल यांनी गुरुचे महत्व सांगुन प्रेरणा दिली.त्यानंतर सहशिक्षिका श्रीमती गोसावी आपले मनोगत व्यक्त केले व गुरुचा महीमा सांगीतला. अध्यक्षीय समारोपानंतर कार्यक्रमाचे आभार व मनोगत सहशिक्षका सीना सिरसट यांनी मानले.
More Stories
ज्ञान महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरूजींना ज्ञानोद्योग विद्यालयात अभिवादन
साहित्यरत्न डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती व लोकमान्य टिळक पुण्यतिथीनिमित्त येरमाळा येथे अभिवादन
ज्ञानोद्योग विद्यालयात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन