बीड – भारतीय संविधानाचे जनक परमपूज्य,महानायक, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त मौजे बोरफडी ता. जि.बीड येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बोरफडीचे सरपंच कैलास घुगे,उपसरपंच लालासाहेब पन्हाळे,ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथ घुगे,गोपीनाथ घुगे,नवनाथ कुटे ,लालासाहेब घुगे,बाबासाहेब कुटे,सोपान वाघमारे,सोमीनाथ वाघमारे, बबनराव वाघमारे,नवनाथ वाघमारे,ग्रामपंचायत अधिकारी विवेक गित्ते,बिभीषण घुगे,माजी चेअरमन महादेव घुगे,निळकंठ घुगे,सुरेश कुटे,नारायण घुगे, भिमराव घुगे,आश्रुबा घुगे,गोरख घुगे,जयवंत ठोंबरे,नागनाथ घुगे इत्यादींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सरपंच कैलास घुगे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे वर्णन करताना शिक्षण,समता,बंधुता आणि न्याय त्याबरोबर व्यसन मुक्त समाज या त्यांच्या कार्याची माहिती दिली.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपीनाथ घुगे यांनी केले तर आभार ग्रामपंचायत अधिकारी विवेक गित्ते यांनी मानले.
More Stories
ॲड.वर्षाताई देशपांडे यांना “युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन अवॉर्ड २०२५”; न्युयॉर्कमध्ये जागतिक सन्मान
बीड येथे आडसूळ-काळे परिवाराचा विवाह सोहळा तंतोतंत वेळेत संपन्न
महाराष्ट्र सरकार “आदिशक्ती अभियान ” राबवणार – सामाजिक कार्यकर्ते बाजीराव ढाकणे