चितेगाव – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.१४ एप्रिल २०२४ रोजी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा चितेगाव येथील शाळेत शालेय विद्यार्थ्यांनासामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर हावळे यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनान अध्ययन, शिस्त,दैनंदिनी,तसेच आपल्या आरोग्य,पर्यावरण,सुरक्षा संबंधीत विषयक मार्गदर्शन केले.यावेळी शालेय विद्यार्थ्यांना समृद्ध समाज फाऊंडेशन छत्रपती संभाजीनगर च्या वतीने बक्षीस वितरण करण्यात आले.या कार्यक्रमांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्र प्रमुख बाबासाहेब पवार,केंद्रीय मुख्याध्यापक विनय साबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अमर सय्यद,राजु पठाण,मोरे सर,सहशिक्षक महेश लबडे ,पारवे सर,सांगळे सर मुबिना मॅडम व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
माथाडी कामगारांना पोलिस संरक्षण द्या;अन्यथा मुंबईत मोर्चाचा इशारा
शेतकरी संघटन बळकट करण्यासाठी राष्ट्रवादी किसान सभा सज्ज;१५ जानेवारीपर्यंत नवी रचना
वंचित बहुजन आघाडीचा प्रशासनावर सवालांचा भडिमार