August 9, 2025

महात्मा बसवेश्वरमध्ये भारतीय सैन्य दलातील शेख आरिफ मलिक यांचा सत्कार

  • लातूर – येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात भारतीय स्थलसेनेत सिग्नल रेजिमेंटमध्ये कार्यरत असणारे शेख अरिफ मलिक यांचा महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई यांच्या हस्ते ग्रंथ आणि लेखनी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी स्टाफ सेक्रेटरी डॉ. रत्नाकर बेडगे,कार्यालयीन प्रमुख नामदेव बेंदरगे यांची उपस्थिती होती.
    शेख आरिफ मलिक हा महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असून बारावी कला शाखेतून शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये उत्तीर्ण झाला आहे. त्याने नुकतेच भारतीय स्थलसेनेचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे त्याचे मूळ गाव बोरवटी ता., जि. लातूर असून पुणे आणि गोवा येथे त्यांनी प्रशिक्षण पूर्ण करून सध्या त्यांची आसाम येथे नुकतीच पोस्टिंग झाली आहे.
    त्यांनी मिळावलेल्या उज्ज्वल यशाबद्दल श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी,प्राचार्य,उपप्राचार्य, पर्यवेक्षक,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
error: Content is protected !!