August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.17डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 265 कारवाया करुन 2,00,200 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: आरोपी नामे-कविता ज्ञानदेव सांळुके, वय 47 वर्षे, रा.सारोळा ता. जि. धाराशिव हे दि.17.12.2024 रोजी 12.10 वा. सु. गावातील आपल्या राहत्या घरासमोरील अंगणात अंदाजे 1,540 ₹ किंमतीची 15 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई)(फ) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.17.12.2024 रोजी 13.40 वा. सु.उमरगा पो ठाणे हद्दीत उमरगा येथील हैद्राबाद ते पुणे जाणारे रोडजवळ मुंसडे कॉम्पलेक्स जवळ छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-सचिन चंद्रकांत बनसोडे, वय 40 वर्षे, रा.शासकीय झोपडपट्टी ता. उमरगा जि. धाराशिव हे 13.40 वा. सु. उमरगा येथील हैद्राबाद ते पुणे जाणारे रोडजवळ मुंसडे कॉम्पलेक्स जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,760 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • स्थानिक गुन्हे शाखा: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.17.12.2024 रोजी 17.30 वा. सु.तामलवाडी पो ठाणे हद्दीत पिंपळा बु. कुलस्वामीनी दुकाना समोर रोडलगत तामलवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-बाळु माणिकराव टिपे, वय 46 वर्षे, रा.गोटकर गल्ली तामलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव, मनोज बचुटे, रा. उळे ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर हे दोघे 17.30 वा. सु. पिंपळा बु. कुलस्वामीनी दुकाना समोर रोडलगत तामलवाडी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,900 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अब्दुल बुह्रान शेख, रा. खिरणी मळा, धाराशिव, नासेर अब्बास कुरेशी, रा. नेहरु चौक, धाराशिव,इरफान यासीन कुरेशी, अर्शद रहेमान कुरेशी दोघे रा. नेहरु चौक, धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.17.12.2024 रोजी 07.30 वा. सु. आपसिंगा गावाबाहेर आपआपल्या ताब्यातील रिक्षा व मोटरसायकलवर 90 किलो गोवंशीय जनावरांचे मांस वाहनासह एकुण 1,58,500 ₹ किंमतीचे विक्री साठी घेवून जात असताना तुळजापूर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द पशु संरक्षण अधिनिय कलम 5 (क) (9) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रामचंद्र टोपा चव्हाण, वय 72 वर्षे, रा.धनगरवाडी तांडा ता. तुळजापूर जि. धाराशिव ह.मु. अणदुर वत्सलानगर यांचे राहते घराचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि.1.12.2024 रोजी 07.00 ते दि. 02.12.2024 रोजी 08.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील कपाटातील चांदीचे दागिने, रोख रक्कम व ज्वारीचे दोन कट्टे असा एकुण 11,500 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-रामचंद्र चव्हाण यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सतिश शांतीनाथ गोंधळी, वय 42 वर्षे, रा.टाकवेड वेस इचलकरंजी ता. हातकणगले जि. कोल्हापुर हे व सोबत त्यांचे नातेवाईक व मित्र असे इचलकरंजीवरुन सम्मेत झारखंड येथे तिर्थ यात्रेसाठी टॅम्पो ट्रॅव्हल्स क्र एमएच 17 बी.डी. 1008 ही मधून जात असताना दि.17.12.2024 रोजी 04.30 ते 05.00 वा. सु. एनएच 52 रोडने येडशी टोल नाका ते जैन मंदीर कुंथलगिरी दरम्यान अज्ञात व्यक्तीने ट्रॅव्हल्समधील 07 बॅगा ज्यामध्ये रोख रक्कम 56,000₹ चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सतिश गोंधळी यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बाळासाहेब केशवराव घुटे, वय 66 वर्षे, रा.दारफळ ता. जि. धाराशिव ह.मु.आनंदनगर धाराशिव 5 एच. पी. पानबुडी ही दि.09.12.2024 रोजी 21.00 ते दि. 10.12.2024 रोजी 07.00 वा. सु. सुरेशराव देशमुख यांचे शिंगोली शिवारातील शेत गट 270 मधील पाण्याचे बंधाऱ्यातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बाळासाहेब घुटे यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बालाजी विक्रम चौधरी, वय 38 वर्षे, रा.राळेसांगवी भुम ह.मु. अविनाश नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 40,000₹ किंमतीची युनिकॉर्न मोटरसायकी क्र एमएच 25 ए.क्यु. 2139 ही दि.13.12.2024 रोजी 10.00 ते दि. 14.12.2024 रोजी 07.00 वा. सु. बालाजी चौधरी यांचे राहते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाजी चौधरी यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- पंकज जयंतराव पाटील, वय 40 वर्षे, व्यवसाय-ठेकेदार रा.कोट गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव यांचे रिलायन्स कंपनीचे जिओ फायबरच्या कामासाठी लागणारे प्लास्टिक ॲल्युमिनीअम, लोखंड ई, साहित्य अंदाजे 1,83,000₹ किंमतीचे अज्ञात व्यक्तीने दि.26.11.2024 रोजी 16.00 ते दि. 27.11.2024 रोजी 11.00 वा. सु. पंकज पाटील यांचे बायपास रोड वरुडा चौक येथील शेत गट नं 187 येथील गोठ्यातुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पंकज पाटील यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2), अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अमित सुखदेव राठोड, अक्षय सुखदेव राठोड,विशाल तुकाराम राठोड, सुखदेव गोविंद राठोड रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.15.12.2024 रोजी 16.30 वा. सु. फिर्यादी नामे- पोपट शोभा राठोड, वय 48 वर्षे, रा. तांबेवाडी ता. बार्शी जि. सोलापूर यांना नमुद आरोपींनी आर्थिक व्यवहाराचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन हात फॅक्चर केला. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पोपट राठोड यांनी दि.17.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव शहर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 117(2) (3) (4), 115(2), 352, 351(2) (3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • कळंब पोलीस ठाणे: मयत नामे-सुनिल विक्रम पवार, वय 24 वर्षे, रा.लोहाटा पुर्व ता. कळंब जि. धाराशिव हे हे दि.03.11.2024 रोजी 18.30 वा.सु.मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 8243 वरुन लोहाटा पुर्व येथुन कळंब येथे जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एक्स 9032 चा चालक सचिन शाहु मुंडे यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून सुनिल पवार यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात सुनिल पवार हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संतोष विक्रम पवार, वय 24 वर्षे, रा. लोहाटा पुर्व ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.17.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) सह 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “हरवलेले/चोरीस गेलेले 30 मोबाईल फोन तांत्रिक पध्दतीने शोधून धाराशिव सायबर पोलीसांनी फिर्यादींना केले परत.”
  • सायबर पोलीस ठाणे :केंद्र सरकारच्या दुरसंचार व दळणवळण विभागाने हरवलेल्या/ चोरीस गेलेल्या मोबाईलचा शोध घेणेकामी CEIR(Central Equipment Identity Register) हे ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. सदरचे पोर्टल धाराशिव जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणेस कार्यन्वित करण्यात आले असुन फिर्यादी स्वत: आपली मोबाईल हरवल्याची तक्रार या पोर्टलवर ऑनलाईन नोंदवू शकतात.
  • धाराशिव जिल्ह्यातील हद्दीमध्ये सन 2023-2024 मध्ये चोरीस गेलेल्या/ हरवलेल्या मोबाईलच्या एकुण 1,276 तक्रारी पोलीसांनी CEIR(Central Equipment Identity Register) या पोर्टलवर अपलोड केल्या होत्या. त्यापैकी एकुण 284 मोबाईल(56,80,431 ₹ किंमतीचे) शोधून काढण्यात धाराशिव पोलीसांना यश आले आहे. त्यापैकी सायबर पोलीसा ठाणेने शोधलेले एकुण 30 मोबाईल (6,03,279₹ ) किंमतीचे हे आज दि. 18.12.2024 रोजी मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव व मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या हस्ते फिर्यादींना परत करण्यात आले. त्यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे फिर्यादींनी पोलीसांचे आभार मानुन समाधान व्यक्त केले आहे.
  • सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक श्री.संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश कासुळे, पोलीस हावलदार- कुलकर्णी, हालसे, नाईकवाडी, महिला पोलीस नाईक- पौळ, पोलीस अमंलदार-जाधवर,भोसले, मोरे, भोसले, तिळगुळे, कदम, काझी, सुर्यवंशी, महिला पोलीस अमंलदार- खांडेकर, शेख यांच्या पथकाने केली आहे.
  • सर्व नागरिकांना धाराशिव पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की, मोबाईल चोरी झाला किंवा हरवला तर जवळच्या पोलीस ठाणेस तक्रार नोंद करावी. त्यांनतर केंद्र सरकारच्या दुरसंचार व दळणवळण विभागाने सुरु केलेल्या https://www.ceir.gov.in या वेबसाईटवर पोलीस ठाणेची फिर्याद व स्वत:चे आधार कार्ड अपलोड करुन ऑनलाईन तक्रार नोंद करावी किंवा सायबर पोलीस ठाणे धाराशिव येथे संपर्क करावा.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!