August 8, 2025

ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात संविधान दिवस उत्साहात साजरा

  • मोहा – ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयात दि.२६ नोव्हेंबर २०२४ रोजी भारतीय संविधान दिनाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन करून विद्यार्थ्यांनी ” संविधान दिन ” उत्साहात साजरा करण्यात आला.
    या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रशालेचे सहशिक्षक कमलाकर शेवाळे यांनी भारतीय संविधान विषयी मनोगत व्यक्त केले.
    यावेळी प्रशालेतील सहशिक्षक सोलंकर शहाजी,श्रीमती पांचाळ उषा,श्रीमती सोनवणे नीता, जाधव व्ही.पी तसेच प्रशालेतील विद्यार्थी ,विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते .
error: Content is protected !!