धाराशिव (जिमाका) – परंडा तालुक्यात कपिलापुरी,सोनारी,रूई खामसगाव,सोनगिरी,कारंजा,भोंजा, वांगेगव्हाण,लोणी व खासगाव या गावांमध्ये बिबट्या हा वन्यप्राणी २१ नोव्हेंबर रोजी आढळून आला आहे.वन विभागाच्या अधिकारी/ कर्मचारी यांनी मोक्यावर जाऊन पाहणी केली असता काही पाळीव जनावरांवर बिबट्याने हल्ला करून ठार मारल्याचे दिसून आले.
खबरदारीचा उपाय म्हणून कपिलापुरी,सोनारी,खामसगाव,रुई,सोनगिरी,कारंजा, भोजा,वांगेगव्हाण,लोणी व खासगावासह इतरही गावात वन कर्मचारी तैनात केले असून ग्रामस्थांना व शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. शेतकऱ्यांनी शेतात रात्री मुक्काम करू नये.जनावरे बंदिस्त गोठ्यात अथवा निवाऱ्यात बांधावे.लहान मुलांना एकट्याने फिरू देऊ नये.अफवांवर विश्वास ठेवू नये. ज्या गाव व शिवारात बिबट्या आढळल्यास संबंधित गावाच्या सरपंचांना कळवावे.अफवा पसरवण्यापासून दूर राहून पुढील संभाव्य मानवी व पाळीव प्राणी यांची होणारी जीवित हानी टाळावी.असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व कॅम्पा) व्ही.बी.तांबे यांनी केले आहे.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा