August 8, 2025

भाजीपाला बाजार रस्त्यावर ट्रॅफिक जाम ! वाहन पार्किंग साठी व्यवस्था करण्याची नागरिकांची मागणी

  • पर्यायी जागा नसल्याने चिखलात भरला बाजार
  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – कळंब परिसरातील शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला विक्रीसाठी कळंब शहरात दररोज घेऊन येतात.भाजीपाला विक्री अंबाबाई देवी मंदिर बाजूच्या रस्त्याच्या दुतर्फा केली जाते, भाजीपाला विक्रेत्यांची संख्या अधिक असेल तर नगर परिषद शाळा क्रमांक १ तसेच शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाकडे,( हावरगांव ) कडे जाणाऱ्या या रस्त्यावर हा बाजार भरतो.कळंब शहराचा आठवडी बाजार सोमवारी असतो व तो कळंब बस स्थानकाच्या बाजूच्या मैदानात भरतो व दररोजची तसेच दर रविवारी भाजीपाला विक्री अंबाबाई देवी मंदिराच्या बाजूच्या रस्त्यावर केली जाते व रविवारी कार्यालयाला सुट्टी असल्याने चाकरमाने भाजी खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात यासाठी नगरपरिषद शाळा क्रमांक १ मैदानात हा बाजार भरतो. या परिसरातील ग्राहक मोठ्या संख्येने भाजी खरेदी करण्यासाठी आपल्या टू व्हीलर वाहनातून येतात भाजी खरेदी साठी घेऊन आलेले आपले टू व्हीलर वाहन मात्र रस्त्यावर उभे केले जातात हा रस्ता वर्दळीचा मार्ग असून राज्य मार्ग आहे.हा मार्ग हावरगांव साखर कारखान्याकडे तसेच परिसरातील गावाकडे जाणार असल्याने रस्त्यावरून वाहनाची येता – यात मोठी असते यामुळे भाजी खरेदीसाठी घेऊन आलेले लोक वाहने रस्त्यावर उभी करतात.त्यामुळे रस्त्यावरून जाणारी प्रवासी तसेच मालवाहतूक करणारी वाहने यांना अडथळा होतो व वारंवार ट्रॅफिक जाम बनते.टू व्हीलर वाहनासाठी स्वतंत्र पार्किंगची व्यवस्था करावी तसेच नगर परिषद शाळा क्रमांक १ मैदान शाळेचे असून देखील या मैदानाचा उपयोग विवाह कार्यक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम, सभा , तमाशे ,मैळावे, यासाठी नगरपरिषदेकडून भाडेतत्त्वावर देण्यासाठी केला जातो. पावसाच्या काळात मैदानात मोठा चिखल होतो.यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्याने चिखलाचे प्रमाण जास्त आहे यातच दिवाळीनिमित्त फटाके स्टॉल साठी नगरपरिषदेने या मैदानाची जागा दिली आहे. दिनांक २७ ऑक्टोबर चा रविवारचा बाजार भाजी बाजार चिखला असलेल्या मैदानात भरविण्यात आला व रस्त्यावर थांबवलेल्या टू व्हीलर मुळे व यातायात करणाऱ्या प्रवासी वाहनामुळे सतत ट्रॅफिक जाम होत होती वाहनाचा धक्का लागून अपघात होण्याची वारंवार शक्यता निर्माण होत होती हे टाळण्यासाठी नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी निश्चित पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच टू व्हीलर व इतर वाहनासाठी पार्किंगची कायमस्वरूपी व्यवस्था करण्याची गरज आहे.
error: Content is protected !!