August 8, 2025

अजित पिंगळे यांना शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी जाहीर होताच कळंब शहरात जल्लोष

  • आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी दाखल करणार
  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – महायुतीची जागा कोणत्या घटक पक्षाला सुटणार व घटक पक्षाचा उमेदवार कोण असणार ही गेली महिनाभर चर्चा सुरू होती याला काल दिनांक २८ ऑक्टोबर रोजी पूर्णविराम मिळाला असून शिंदे शिवसेनेने रात्री उशिरा दहा वाजता उमेदवाराची यादी जाहीर केली व उस्मानाबाद – कळंब मतदारसंघातून अजित ( दादा ) पिंगळे यांचे नांव जाहीर होताच महायुती घटक पक्षातील कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाक्याची आतिषबाजी केली.
    उस्मानाबाद – कळंब हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असून २०१९ साली विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे कैलास ( दादा )घाडगे पाटील विजयी झाले होते, यानंतर शिवसेनेत फूट पडली व कैलास घाडगे-पाटील हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत थांबले ते विद्यमान आमदार असल्याने महाविकास आघाडी मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची त्यांना उमेदवारी जाहीर झाली व दिनांक २८ ऑक्टोबर रोजी शक्ती प्रदर्शन करत कैलास ( दादा ) घाडगे पाटील यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे तर महायुती घटक पक्ष असलेले भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस-अजित ( दादा ) पवार व शिवसेना शिंदे या घटक पक्षापैकी ही जागा कोणत्या पक्षाला सुटणार व उमेदवारी कोणाला मिळणार ही चर्चा मतदारसंघात होती. अखेर २८ ऑक्टोबर रोजी रात्री उशिरा दहा वाजता शिवसेना शिंदे पक्षाने उमेदवाराची अंतिम यादी जाहीर केली व यात अजित (दादा) पिंगळे यांना उमेदवारी जाहीर झाली.अजित(दादा) पिंगळे हे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत यामुळे पक्षाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे पक्षात प्रवेश व उमेदवारी दाखल करणार उस्मानाबाद- कळंब विधानसभा मतदारसंघाची जागा महायुतीकडे राहावी यासाठी अजित ( दादा ) पिंगळे यांच्या उमेदवारीला महायुतीतील घटक पक्षाकडून ही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे समजते.शिवसेना शिंदे पक्षाकडून उमेदवारी मिळावी म्हणून शिवसेना उबाठा पक्षाचे तालुकाध्यक्ष शिवाजी ( आप्पा) कापसे यांनी शिंदे शिवसेना शिंदे पक्षात शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश केला होता तर सुधीर (आण्णा ) पाटील यांनी भारतीय जनता पार्टीचा त्याग करीत शिवसेना शिंदे पक्षाचा झेंडा हाती घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत धाराशिव (उस्मानाबाद ) येथे मेळावा आयोजित केला होता तर निष्ठावंत म्हणून धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख नितीन लांडगे,संजय मुंदडा तसेच सुरज महाराज साळुंखे हे उमेदवारीसाठी प्रयत्न करीत होते.आज २९ ऑक्टोबर उमेदवारी दाखल करण्याचा करण्याचा शेवटचा दिवस असून राजकीय घडामोडीला वेग आला आहे.अजित (दादा) पिंगळे हे शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करीत आहे.
error: Content is protected !!