कळंब – धाराशिव कळंब मतदार संघासाठी काँग्रेस पक्षाकडून पांडुरंग कुंभार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पांडुरंग कुंभार यांनी धाराशिव येथील कार्यालयात काँग्रेस कमिटीचे मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष सय्यद खालील,युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर,काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ मैदाड ,गोरोबा वरपे, यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. काँग्रेस पक्षांच्या वरिष्ठ नेते मंडळींच्या आदेशानुसार इच्छूक उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत असून कळंब तालुका काँग्रेस आय पक्षाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडी झाले असल्याचे अद्यापही वरिष्ठ नेत्यांनी सांगितले नाही.पक्षाचा जो आदेश येईल त्याप्रमाणे काँग्रेसचे पदाधिकारी काम करतील.
** मी काँग्रेस आय पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.पक्षाने अजूनही आघाडी झाली असल्याचे जाहीर केले नाही. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार पुढील बाबींचे पालन केले जाईल. पांडुरंग कुंभार तालुकाध्यक्ष.कळंब
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला