धाराशिव (जिमाका)- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -२०२४ करीता भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले निवडणूक निरीक्षक (खर्च) अलुरू व्यंकट राव (IRS) यांचे दि. २२ ऑक्टोबर रोजी जिल्हयात आगमन झाले.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष व अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. राव यांचा मुक्काम व कार्यालय शासकीय विश्रामगृह,शिंगोली येथील अजंठा या सूटमध्ये आहे.त्यांच्या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२४७२ – २३५४७० असा असून त्यांचा भ्रमणध्वनी ९०२१५२४२१२ हा आहे.निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याशी निवडणूकविषयक प्रश्नाबाबत भेटीची वेळ ही सकाळी १०.०० ते ११.०० दरम्यानची निश्चित केली आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला