August 8, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “अवैधरित्या गुटखा व पान मसाला वाहतुक करणाऱ्यावर पोलीसांची कारवाई.”
  • दि.21.10.2024 रोजी मुरुम पोलीस ठाण्याचे पथक हे पोलीस ठाणे हद्दीत कोथळी बेळंब जाणारे रोडवर पुलाचे जवळ नकाबंदीस असताना पथकास गुप्त बातमी मिळाली की,एक पांढऱ्या रंगाची स्वीप्ट डिझायर वाहनामध्ये अवैध गुटखा वाहतुक करीत आहे. त्यावर पथकाने स्वीप्ट डिझायर गाडी क्र एमएच 01 बी.टी.6144 थांबवून चेक केले असता त्यात महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा मिळून आला. सदर वाहनाचा चालक यास त्याचे नाव गाव विचारले असता त्यांने त्याचे नाव- शेख तौफीक गणी शेख, वय 31 वर्षे,रा.अजमेर नगर बालेपीर नगर रोड बीड ता. जि. बीड असे सागिंतले त्यावर पथकाने सदर स्वीप्ट कार व त्यातील मिळून आलेला हिरा पान मसाला 10 पोते,रॉयल 717तंबाखुनावाचे एकुण 200 पॉकेट अंदाजे 3,00,000₹ किंमतीचा सह स्वीप्ट डिझायर गाडी क्र एमएच 01 बी.टी.6144 असा एकुण 9,00,000₹ किंमतीचा मिळून आलेने जप्त करुन मिळून आलेला माल व आरोपी नामे- शेख तौफीक गणी शेख, वय 31 वर्षे, रा. अजमेरनगरबालेपीरनगर रोड बीड ता. जि. बीड यास ताब्यात घेवून आरोपी याचे विरुध्द पोलीस ठाणे मुरुम येथे गुरनं 303/2024 भा.न्या.सं.कलम 223,274,275,123 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास परि. पोलीस उप निरीक्षक गाडेकर करत आहे.
    सदर कामगिरी ही पोलीस अधीक्षक संजय जाधव,अपर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार,मुरुम पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दहिफळे,परि पोउपनि गाडेकर,पोलीस अंमलदार तोरंबे, लोंढे,राठोड यांचे पथकाने केली.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
  • “अवैध मद्य विरोधी विशेष मोहिमेदरम्यान जिल्हा भरात 17 छापे.”
  • मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या आदेशावरुन काल सोमवार दि.21.10.2024 रोजी अवैध मद्य विरोधी विशेष मोहिम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान 17 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेला गावठी दारु निर्मीतीचा सुमारे 3,300 लि. द्रव नाशवंत असल्याने तो जागीच ओतून नष्ट करण्यात आला तर सुमारे 705 लि. गावठी दारु, 520 लि.सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी- विदेशी दारुच्या एकुण 120 बाटल्या असे मद्य जप्त केले. ओतून दिलेला मद्यार्क निर्मीतीचा द्रव व जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,14,800 ₹ आहे. यावरुन 17 व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 17 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1) धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यात पारधी पिढी जुना बस डेपो ता. जि.धाराशिव येथील- अशोक राजेंद्र काळे, वय 42 वर्षे, हे जुना बसडेपो पारधी पिढी येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला एकुण सुमारे 2,400 लि. द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले. तसेच नितीन अनिल शिंदे, वय 29 वर्षे, रा. झोरे गल्ली भारत टाकी जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव हे 09.45 वा. सु. धाराशिव शहरातील देशपांडे स्टॅन्ड बाजारमंडई जिजामाता उद्यान जवळ देशी विदेशी दारुच्या 12 सिलबंद बाटल्या रिक्षा सह अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 2) वाशी पोलीस ठाण्याच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. यात सरमकुंडी ता वाशी जि. धाराशिव येथील- कमलबाई लाला काळे, वय 65 वर्षे, या 13.15 वा.सु. सरमकुंडी ते तांदुळवाडी जाणारे रोडवर असलेल्या आपल्या पत्र्याचे शेड समोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 100 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले. तसेच लांजेश्वर ता. भुम जि. धाराशिव येथील- भिवा लक्ष्मण कांबळे, हे15.50 वा.सु. लांजेश्वर ता. भुम येथील तावरे वस्ती रोडलगत देशी विदेशी दारुच्या 10 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले. तसेच पिंपळगाव लिंगी ता. वाशी जि. धाराशिव येथील- ऋषीकेश रामदास लोकरे, वय 23 वर्षे, हे 18.30 वा. सु. पिंपळगाव लिंगी येथे रोडलगत आपल्या पत्र्याचे शेड समोर 30 लिटर अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना पथकास आढळले.
  • 3) नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने आरळी शिवार व अणदुर गावात 2 छापे टाकले. यावेळी सलगरा दि.ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील- व्यंकट झुंबर पवार, हे 16.45 वा. सु. सलगरा दि. येथील दिलखुलास हॉटेलच्या बाजूस देशी विदेशी दारुच्या 91 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेल्या असताना आढळल्या. तसेच धुमरे पाटील तांडा अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव येथील-दाउद नबीलाल शेख, वय 48 वर्षे, हे 21.00 आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु 60 लिटर अवैध विक्रिच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 4)धाराशिव ग्रामीण पो.ठा. च्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी घाटंग्री ता. जि. धाराशिव येथील- शोभा भागवत बल्लाळ, वय 52 वर्षे, या 18.00 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर 300 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले. तसेच नारेवाडी ता. बार्शी जि. सोलापूर येथील-सतिष रामभाउ शिंदे, हे धाराशिव बार्शी रोडवर किनारा हॉटेलच्या बाजूस देशी विदेशी दारुच्या 8 सिलबंद बाटल्या अवैध क्रिच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 5)स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली गावात छापा टाकला. यावेळी वाघोली ता. कळंब जि. धाराशिव येथील-आशाबाई शाहु पवार, वय 44 वर्षे, या आपल्या राहत्या घरासमोर गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 400 लिटर द्रव व 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 6)तुळजापूर पो.ठा.च्या पथकाने तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ गावात छापा टाकला. यावेळी -भारत जनार्धन शिंदे, वय 46 वर्षे हे सिंदफळ गावात शिवाजी नगर झोपडपट्टी शिवारात 70 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 7)कळंब पो.ठा.च्या पथकाने पाणी टाकी जवळ मार्केट यार्ड कळंब येथे छापा टाकला. यावेळी –छाया सिकंदर काळे, वय 19 वर्षे या माकेर्ट यार्ड कळंब येथे गावठी दारु निर्मीतीचा गुळ- पाणी मिश्रीत अंबवलेला सुमारे 400 लिटर द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 8)मुरुम पो.ठा. च्या पथकाने आनंदनगर मुरुम येथे छापा टाकला. यावेळी- सिध्दार्थ विठ्ठल बनसोडे, वय 40 वर्षे हे मुरुम येथील आठवडी बाजाराचे डावे बाजूस पत्र्याचे शेड मध्ये 55 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 9)भुम पो.ठा. च्या पथकाने गोरमाळा गावात छापा टाकला. यावेळी उळूप ता. भुम जि. धाराशिव येथील–लता बन्सीलाल पवार, वय 65 वर्षे, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव या 17.30 गोरमाळा फाटा ते गोरमाळा गावात रोड लगत येथे 90 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 10)उमरगा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यावेळी नेहय नगर मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव येथील–प्रभु दुर्गाप्पा कोळी, वय 45 वर्षे, हे 19.30 वा. सु. उमरगा ते एकोंडी जहागीर रोडवर श्रीकांत शिंदे यांचे शेताजवळ 400 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 11)लोहारा पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यावेळी नागराळ ता. लोहारा जि. धाराशिव येथील–उमाकांत शेषेराव गोरे, वय 33 वर्षे, हे 19.15 वा. सु. लोहारा ते हिप्परगा रेाडवरील सिंहगड बार चेबाजूस 120 पाउच सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.
  • 12)ढोकी पो.ठा. च्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. यावेळी जागजी ता.जि. धाराशिव येथील- बालाजी धोंडीराम इंगळे, वय 40 वर्षे, हे 13.15 जागजी येथे 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असताना आढळले.(सोबत अवैध मद्य विरोधी छाप्याची छायाचित्रे.)
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!