धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोंबर २०२४ रोजी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- २०२४ चा कार्यक्रम घोषीत केला आहे.त्यामुळे आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्हयातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून राजकीय पक्ष,निवडणूक लढविणारे उमेदवार,किंवा त्यांचे प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी सार्वजनिक इमारती ठिकाणी,सार्वजनिक रस्त्यांवर, निवडणूकीच्या संबंधी पोस्टर्स,बॅनर्स, पॉम्प्लेटस,कटआउटस,होर्डीग,कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होऊ शकतो किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी एका आदेशाव्दारे २५ नोव्हेंबरपर्यत निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी,रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निर्बंध घातले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला