धाराशिव (जिमाका) – विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्षाच्या प्रचाराचे कापडी फलक,झेंडे लावणे यावर काही बंधने घालण्याची आवश्यकता लक्षात घेवून आणि संबंधितांना नोटीस देवून त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्यस्थितीत शक्य नसल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ चे आदेश १५ ऑक्टोंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार आहे.
या कलमातील आदेशाव्दारे फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रीन ग्लासच्या पुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनांच्या टपापासून २ फुट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. मोटार सायकलवर झेंडा १ X ½ यापेक्षा जास्त आकाराचा असू नये. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे, वाहनांच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा. इतर कोणत्याही बाजुने तो लावता येणार नाही.
फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष,उमेदवारांचे निवडणूक प्रतिनिधी यांच्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नसल्याचे या आदेशात म्हटले आहे.
More Stories
आरोग्य सेवेची नवी झेप : जिल्ह्यात अत्याधुनिक आरोग्य सुविधांमुळे रुग्णांना दिलासा
धाराशिव जिल्ह्यात ५७४ रुग्णांना सुमारे ४.८४ कोटींची मदत
रोटरी क्लब धाराशिवचा वार्षिक आढावा व वोकेशनल अवॉर्ड सोहळा उत्साहात;पांडुरंग घोडके यांचा विशेष सन्मान