उमरगा – येथील समाज विकास संस्थेच्या वतीने मलंग विद्यालयांमध्ये मुलींसाठी ड्रेसचे मदत करण्यात आली. समाज विकास संस्थेचा दान उत्सव हा प्रकल्प कायमस्वरूपी चालू असतो.पालावर राहणारे लोक महिला,पुरुष,रस्त्यावरून मुले गरजू लोक,आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लोक, शाळाबाह्य मुलं,शाळेत जाणारी मुलं ज्यांना कपड्याची वाणवा दिसून येते.अशा उपेक्षित दुर्लक्षित दुर्बल घटकातील लोकांना नियमित कपडे,रेशन, अन्नधान्य शैक्षणिक साहित्य अशा पद्धतीचे साहित्य देण्याचे काम समाज विकास संस्थेचे भूमिपुत्र वाघ हे नियमित करत असतात. दि.८ ऑक्टोबर २०२४ रोजी मलंग विद्यालयातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना ड्रेसचे वाटप करण्यात आले सोबत सर्व शिक्षक यांना भूमिपुत्र वाघ यांचा प्रकाशित केलेला काव्यसंग्रह प्रदान करण्यात आला.या प्रसंगी शाळेचे हेडमास्तर गोबारे आणि शिक्षक वृंद सहभागी झाले होते.यावेळी सहशिक्षिक परमेश्वर सुतार यांनी सूत्रसंचालन आणि आभार मानले.
**मलंग विद्यालय उमरगा जिल्हा धाराशिव या ठिकाणी समाज विकास संस्थेच्या वतीने गुणवंत लेकींना ड्रेस देऊन तर गुणवंत शिक्षकांना कवी भूमिपुत्र वाघ यांचा काव्यसंग्रह घेऊन सन्मानित करण्यात आले.
More Stories
बसस्थानकाच्या बांधकामासाठी निधी कमी पडू देणार नाही – पालकमंत्री प्रताप सरनाईक
उमरगा शहर व तालुक्यामध्ये वृक्ष लागवड
आरोग्य क्षेत्रात समाज विकास संस्थेचे कार्य उल्लेखनीय