कळंब – रोटरी क्लब ऑफ कळंब सिटी च्या वतिने उत्कृष्ट गणेश मंडळ देखाव्यासाठी स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत शिवशंकर गणेश मंडळ जुनी सोनार लाईन या गणेश मंडळास उत्कृष्ट देखाव्यासाठीचे द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या गणेश मंडळांने जिद्द ही लघु नाटिका सतत पाच दिवस गणेश मंडळासमोर सादर केली.या नाटिकेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकऱ्याचा मुलगा घरची परिस्थिती प्रतिकूल असताना पोलीस दलात भरती होण्यासाठी तयारी करतो व पोलीस शिपाई बनतो.त्याची जिद्द यशाकडे घेऊन जाते हे यातून दाखविली आहे. या नाटिकेस कळंब मधील गणेश भक्त ,दर्शक श्राेते वर्गातून चांगली पसंती मिळाली या नाटिकेमध्ये कलाकार म्हणून मनोज शिंगणापूरे,प्रसन्ना हुलसुलकर,चेतन पतंगे,बाजीराव शिंदे यांनी उत्कृष्ट भूमिका केल्या या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी डिस्ट्रिक 31 32 चे डीजीई रो.सुधीर लातुरे,एजी .रो. गणेश मुळे ,उपशिक्षण अधिकारी दत्तात्रय लांडगे, प्रोजेक्ट रोटरी क्लब अध्यक्ष अरविंद शिंदे, सचिव अशोक काटे, प्रोजेक्ट चेअरमन प्रा.संजय सावंत ,श्रीकांत कळंबकर ,बालाजी जाधव यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात सामान्य ज्ञान स्पर्धा चित्रकला स्पर्धा बॅडमिंटन स्पर्धा तसेच शिक्षकासाठी नेशन बिल्ड अवार्ड व उत्कृष्ट गणेश मंडळ देखावे या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना 2 ऑक्टोबर रोजी आयोजित कार्यक्रमात बक्षीसे देण्यात आली शिवशंकर गणेश मंडळाचे अध्यक्ष पवन वेदपाठक ,सचिव अतुल पाटील, उपाध्यक्ष वेदांत हुलसुलकर यांनी व गणेश मंडळ सदस्य कलाकारांनी बक्षीस स्वीकारले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील तीर्थकर यांनी तर आभार प्रदर्शन संजय घुले यांनी केले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी