कळंब ( अमोल रणदिवे ) – इटकुर येथे दिनांक ७ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय कक्ष उपमुख्यमंत्री, गृहविभाग कार्यालय व श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, हासेगाव (शि.) ता.कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिर चे आयोजन केले होते. इटकुर गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ.मोहतरताई हणमंत कसपटे,उपसरपंच विलास देविदास गाडे,सचिन गंभीरे, पोलीस पाटील सोमनाथ जगताप,राजकुमार अडसुळे, महादेव पावले,सत्यदेव कोळी, प्रद्युमन कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते. शिबिरातील लाभार्थ्यांचे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करण्यात येणार असून इटकुर ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक डॉ. सरोजनीताई राऊत यांनी केले. दरम्यान तज्ञ डॉक्टर म्हणून जनऔषध वैद्यकशास्त्र डॉ. स्वप्निल तानाजी सांगळे, शासकीय वैद्यकीय सर्जन डॉ. अजित डीकले,डॉ.निहाल सिकंदर,डॉ.मिटकरी,डॉ.भाग्यश्री भोसले,डॉ.सौरभ मांजरेकर, मनीष खंडागळे, प्रज्ञावंत रणदिवे,तिरुपती केंद्रे, विश्वजीत जगदाळे, श्रीमती ज्योती कदम या नर्स, आशा कार्यकर्त्यासह पंचक्रोशितील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
More Stories
तथागत बुद्ध विहार येथे रमाई जयंती उत्साहात साजरी
कल्पनानगर येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
कळंब शहरात स्वच्छतेचा आढावा घेण्यासाठी नगराध्यक्ष कापसे पहाटेच उतरल्या रस्त्यावर