धाराशिव (जिमाका ) – शारदीय नवरात्र महोत्सवात दि. ८ ऑक्टोबर रोजी मंगळवारी सहाव्या माळेच्या दिवशी श्री.तुळजाभवानी देवीजींची मुरली अलंकार महापूजा करण्यात आली.श्री तुळजाभवानी देवीजींचे हे रुप अत्यंत मनमोहक आहे. श्री तुळजाभवानी देवीजींची आज नित्योपचार पुजा आणि अभिषेक पूजेनंतर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली.पाचव्या माळेपासून विविध अलंकार रुपातील श्री. देवीजींची पूजा मांडण्यात येत आहे.
दररोज नियमित श्री.तुळजाभवानी देवीजींचे विविध धार्मिक विधी विधीवत पार पाडले जातात.उद्या ९ ऑक्टोबर रोजी शेषशाही अलंकार महापूजा,१० ऑक्टोबर रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि ११ ऑक्टोबर रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे.
काल ७ ऑक्टोबर रोजी सोमवारी रात्री १० वाजता पाचव्या माळेच्या दिवशी श्री.देवीजींची छबिना मिरवणूक नंदी वाहनांवरुन काढण्यात आली.
More Stories
नळदुर्ग येथील कन्या प्रशालेत यशस्वी विद्यार्थिनींचा गौरव
राष्ट्रीय ओबीसी बहुजन शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अनंत फुलसुंदर यांची निवड
येत्या दोन वर्षात तुळजापूरचा कायापालट करु – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही