March 26, 2026

दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत श्रीमती प्रतिभा गांगर्डे प्रथम

  • कळंब – महाराष्ट्र शासन राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आयोजित दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेत सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंबच्या सहशिक्षिका तथा स्काऊट गाईड कॅप्टन श्रीमती प्रतिभा रामचंद्र गांगर्डे यांनी पहिला क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी,ज्ञानरचनावाद अध्यापन पद्धत,शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती इ.नववी, दहावी या गटातून इयत्ता नववीच्या कुमारभारती (मराठी ) पाठ्यपुस्तकातील ‘बिग ५’च्या सहवासात (स्थूलवाचन)या पाठावर आधारित शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती केली होती. शासन स्तरावरून या उपक्रमाची निवड करण्यात आली आहे. नववी,दहावी मराठी भाषा विषय या गटातून तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकावला आहे.
    या मिळवलेल्या यशाबद्दल गटशिक्षण कार्यालय पंचायत समिती कळंब येथील साधन व्यक्ती नवनाथ नकाते व कॉलेजचे प्राचार्य काकासाहेब मुंडे,उपप्राचार्या डॉ.मिनाक्षी शिंदे मॅडम ,समर्थ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुलभा शिंदे यांनी सहशिक्षिका प्रतिभा गांगर्डे यांचा यथोचित सत्कार केला.
    यावेळी सहशिक्षिक ठाकूर, सावंत,टारपे,श्रीमती वनिता साचणे व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
error: Content is protected !!