धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.30 सप्टेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 102 कारवाया करुन 73,800 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.29.09.2024 रोजी 21.30 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत आय टी आय कॉलेजच्या बाजूला पुजा बारचृया पाठीमागे धाराशिव येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-लक्ष्मण विठ्ठल साळुके, वय 50 रा. जुना बस डेपो, सचिन संभाजी हिवरे, वय 41 रा. सुशीला नगर, गौतम श्रीमंत तेरकर, वय 40 वर्षे, रा. गावसुद, रियाज हानिफ पटेल, वय 48 वर्षे, रा. सलगरा दि. बापु चंदर कोकाटे, वय 37 वर्षे, रा. तुळजापूर नाका, खुद्दुश अलीशेर शेख, वय 38 वर्षे, रा. सलगरा दि., विनोद मारुती भांडवले, वय 36 वर्षे, अर्जुन बाजीराव जाधव, वय 62 वर्षे, रा. दोघे सुशीलानगर, मगन सुखदेव तेरकर, वय 50 रा.गावसुद ता. जि. धाराशिव हे 21.30 वा. सु. आय टी आय कॉलेजच्या बाजूला पुजा बारचृया पाठीमागे धाराशिव येथे तिरट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 7,960 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले.
ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलीसांनी दि.30.09.2024 रोजी 16.00 वा. सु.ढोकी पो ठाणे हद्दीत ढोकी पेट्रोलपंप चौक येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अंकुश उत्तम परसे, वय 36 वर्षे रा.ढोकी ता. जि. धाराशिव हे 16.00 वा. सु. ढोकी पेट्रोपंप चौक येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,110 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले.
तामलवाडी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.30.09.2024 रोजी 16.30 वा. सु.तामलवाडी पो ठाणे हद्दीत तामलवाडी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-नेताजी सुर्यभान जाधव, वय 42 वर्षे रा. गंगेवाडी ता.दक्षिण सोलापूर जि. सोलापूर हे 16.30 वा. सु. तामलवाडी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 460 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तामलवाडी पो. ठाणेच्या पथकास आढळले.
येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.30.09.2024 रोजी 17.00ते 19.00 वा. सु.येरमाळा पो ठाणे हद्दीत 3 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-अशोक विश्वनाथ वाघमारे, वय 61 वर्षे रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. वडगाव ज. गावातील मारुतीचे मंदीरासमोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,300 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-रामचंद्र विठ्ठल पवार, वय 40 वर्षे रा. रत्नापूर ता. कळंब जि. धाराशिव हे 19.00 वा. सु. येडेश्वरी मंदीर कमानीसमोर येरमाळा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 940 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. आरोपी नामे-महादेव बापू गायकवाड, वय 44 वर्षे रा. साठेनगर तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव हे 17.50 वा. सु. हॉटेल सहाराचे समोर तेरखेडा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,150 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले.
यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये संबंधीत पो ठाणे येथे स्वतंत्र गुन्हे नोंदवले आहेत.
“ मारहाण.”
उमरगा पोलीस ठाणे :आरोपी नामे-गोपाळ सिताराम राठोड, वय 35 वर्षे,रा. कराळी तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 29.09.2024 रोजी 21.30 वा. सु. कराळी तांडा येथे फिर्यादी नामे-जनाबाई गुलाब पवार, वय 32 वर्षे, रा. कराळी तांडा ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने लाईट बंद पडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोपाळ राठोड यांनी दि.30.09.2024 रोजी दिलेल्या प्रथ खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ नुकसान करणे.”
शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दत्ता केशव गाडेकर, वय 35 वर्षे, रा. सौंदणा आंबा ता. कळंब जि. धाराशिव यांचे सौंदणा आंबा शिवारातील शेत गट नं 263 मधील सोयाबीन पिकाचा ढिगारा 22 कट्ट्याचा ढिगारा हा दि. 29.09.2024 रोजी 20.00 ते दि. 30.09.2024 रोजी 05.30 वा. सु.अज्ञात व्यक्तीने जाळून टाकून दत्ता गाडेकर यांचे अंदाजे 80,000₹ चे नुकसान केले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दत्ता गाडेकर यांनी दि.30.09.2024 रोजी दिलेल्या प्रथ खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 326 (एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे: मयत नामे- सचिन महादेव कसबे, वय 35 वर्षे, रा. आठवडी बाजार जवळ धाराशिव ता. जि. धाराशिव यांने दि.23.09.2024 रोजी 00.00 ते 07.00 वा.सु. पापनास नगर येथील आंब्याच्या झाडास गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- मिना उर्फ मनिषा सिध्देश्वर घायाळ, पुजा श्ध्दिेश्वर घायाळ दोघी रा. पापनास नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी मागील काही दिवसांपासून मयत सचिन यास मारहाण करुन तुझी पत्नी व मुलाबाळाकडे राहण्यास जावू नकोस तु माझ्या जवळ राहा असे म्हणून भाडंण तक्रारी करुन मानसिक त्रास दिल्यामुळे. त्यांचे त्रासास कटाळूंन सचिन यांने गळफास घेवून आत्महात्या केली. आकस्मात मृत्युचे चौकशी वरुन मयताची पत्नी फिर्यादी नामे-योगिता सचिन कसबे, वय 23 वर्षे, रा. आठवडी बाजार जवळ धाराशिव ता.जि. धाराशिव यांनी दि.30.09.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-108, 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
सायबर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-दिलीप राजकुमार शहा, वय 56 वर्षे, रा.सोनारी ता. परंडा जि. धाराशिव हे दि.03.08.2024 ते दि.25.09.2024 रोजी सोनारी येथे असताना aarush stock a20 हॉटसअप ग्रुप ॲडमिन व aishwarya shetty(https://wa/447463821750) नावाचे हॉटसअप ग्रुप ॲडमीन व बॅक खातेधारकांनी दिलीप शहा यांना Block trade& IPO चे नावाखाली इन्वेंसमेंट करण्याचे सांगून टप्याटप्याने पैसे भरण्यास सांगून 2,06,500₹ किंमतीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- दिलीप शहा यांनी दि.30.09.2024 रोजी दिलेल्या प्रथ खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(1) सह 66(सी) 66(डी) माहिती तंत्रज्ञान अधिनियम सुधाराणा 2008अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“अवैध मद्य विरोधी पोलीसांची 4 ठिकाणी छापा कारवाई.”
पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल सोमवार दि.30.09.2024 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 4 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले 5,900 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव व सुमारे 660 लि. गावठी दारु असे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 4,59,200 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 4 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
1)ढोकी पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-उत्तम रुपा राठोड, गोपीनाथ पांडुरंग आडे, रामभाउ गंगाराम आडे,ज्ञानदेव देविदास जाधव, सर्व रा. जागजी तांडा ता. जि. धाराशिव हे 06.45 वा. सु. जागजी तांडा अंदाजे 2,01,000 किंमतीची 250 लिटर गावठी दारु व 2,200 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-बाळु बाबुराव जाधव, केशव शंकर राठोड, शामराव धनु जाधव, विनायक गोविंद राठोड, जागजी तांडा ता. जि. धाराशिव हे 06.45 वा. सु. जागजी तांडा अंदाजे 2,35,000 किंमतीची 350 लि. गावठी दारु व 3,500 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
2)तुळजापूर पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-राजेंद्र रघु पवार, वय 41 वर्षे, रा.गावसुद ता. जि. धाराशिव हे दि 30.09.2024 रोजी 11.45 वा. सु. आपसिंगा येथे अंदाजे 1,200 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
3)धाराशिव शहर पो ठाणेच्या पथकाने 1 ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-नानी जगन पवार, वय 55 वर्षे, रा.साठेनगर पारधी पिढी धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि 30.09.2024 रोजी 16.00 वा. सु. साठेनगर पारधी पिढी धाराशिव येथे अंदाजे 22,000 ₹ किंमतीची 40 लिटर गावठी दारु व 200 लि. गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला