June 25, 2026

पत्रकार नियुक्तीबद्दल संघपाल सोनकांबळे यांचा सत्कार

  • आष्टा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भीड व अभ्यासू व्यक्तिमत्त्व असलेले सुभाष द.घोडके यांच्या लेखणीने परिपूर्ण असलेले सा.साक्षी पावनज्योतचे विशेष प्रतिनिधी पदी संघपाल सोनकांबळे यांची नियुक्ती झाल्यामुळे दि.२५ सप्टेंबर २०२४ रोजी ज्ञान प्रसारक मंडळ संचलित विद्यामंदिर हायस्कूल आष्टा ता.भूम येथे मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते हायस्कूलचे सर्व कर्मचारी वृंद व विद्यार्थ्यांच्या वतीने यथोचित सत्कार करून सा.साक्षी पावनज्योतच्या अंकाचे वाटप करण्यात आले.
    याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव व हायस्कूलचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.

error: Content is protected !!