कळंब – दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी कळंब तालुक्यात अचानक दुपारी ४.४५ ते ५.३० या वेळेत वादळ वारा व विजेच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला. यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. सोसाट्याच्या वादळ वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाला. यामध्ये भाट शिरपुरा येथील अजय आसाराम गायकवाड वय २१ या तरुण शेतकऱ्याचा काढलेल्या सोयाबीनची गंज झाकत असताना वीज पडल्याने जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.
या घटनेची माहिती मिळाल्याने शिराढोण पोलीस स्टेशनचे पथक भाट शिरपुरा गावाकडे रवाना झाले असल्याचे समजते. या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे शेतामध्ये पाणी झाल्याने तसेच काढलेले सोयाबीन भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अचानक ढग जमा होऊन हा पाऊस झाला असून कळंब तालुक्यातील भाट शिरपुरा ,मंगरूळ, आंदोरा व या गावात जोरदार पाऊस झाल्याचे वृत्त आहे कळंब शहरातही जोरदार पावसाच्या सरी कोसळल्या.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले