केज – तालुक्यातील उंदरी येथील कालकथित चंद्रभागा रामभाऊ ढालमारे वय – ९२ यांचे दिनांक २१ सप्टेंबर २०२४ रोजी रात्री १०.०० वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पश्चात धोंडीराम ढालमारे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात वरिष्ठ लिपिक पदावून सेवानिवृत्त ,बालासाहेब ढालमारे पोलीस खात्यात जमादार पदावरून सेवानिवृत्त,बलभीम ढालमारे हे पुणे येथील कंपनीत कामास आहेत तर वच्छिष्ठ ढालमारे हे शेती करतात.अशी चार मुले व मीरा उत्तम वारकरी,भीवर काकासाहेब पोटभरे अशा दोन मुली,सुना,नातरूंडे,पतरुंडे असा मोठा परिवार आहे. चंद्रभागा ह्या अत्यंत सोज्वळ, प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या असून वयाच्या ९२ व्या वर्षी देखील लहान थोरांच्या अक्का होत्या. त्यांच्या निधनामुळे परिसरात व ढालमारे परिवारात दुःखाची छाया पसरली आहे.
More Stories
भगवान दहीरे यांचे दुःखद निधन
“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित
शिक्षणाचा प्रसार मराठवाड्यात करणारे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन