वाशी- शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव लिंगी येथील संभाजी विद्यालयात आज दिनांक १७ सप्टेंबर २०२४ रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा ७६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्रामाचे प्रणेते स्वामी रामानंद तिर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशालेचे मुख्याद्यापक युवराज सावंत,शालेय समितीचे अध्यक्ष पंडीतराव कोल्हे, सदस्य शिवाजीराव सुकाळे यांच्या हस्ते करण्यात आले तर ध्वजारोहण प्रशालेचे मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रध्वजाला वंदन करताना “जन-गण-मन” या राष्ट्रगीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर ” जय जय महाराष्ट्र माझा” या राज्यगीताचे गायन करण्यात आले. त्यानंतर प्रशालेतील सांस्कृतीक विभाग प्रमुख सुहास जगताप यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी स्वच्छतेची शपथ प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच उपस्थित सर्व मान्यवरांना देण्यात आली. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन हा महाराष्ट्रातील एक राजकीय उत्सव आहे. हा सण दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. या दिवशी १९४८ मध्ये मराठवाड्यातील निजामाची सत्ता संपली आणि ती भारताचा एक भाग बनली.आज मराठवाडा महाराष्ट्राचा एक प्रादेशिक विभाग आहे.मराठवाड्याची शांती संतांची पावन संस्कृती म्हणून ओळखली जाते. या अधिकारातच आद्यकवी मुकुंदराज, चक्रधर स्वामी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत जनाबाई यासारखे विश्ववंद्य संत निर्माण करतात. ऐतिहासिक काळापासून महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मराठवाडा आग्रभागी होता. विविध कालखंडातील राजवटीमध्ये मराठवाड्याने स्वतःचे वेगळे असे व्यक्तीमत्व जपले आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामविषयीची माहीती तसेच मराठवाडा संग्रामातील शुरविरांच्या शौर्यगाथा अशा अनेक विविध पैलूवरती मुख्याद्यापक युवराज सावंत यांनी मागदर्शन केले. यावेळी कार्यकम्राचे सुत्रसंचालन सुहास जगताप यांनी तर कार्यक्रमाचा समारोप संतोष बोडके यांनी केला. अशाप्रकारे कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी या गावचे तंटा मुक्ती अध्यक्ष राजाभाऊ सुकाळे तसेच या गावचे नागरीक व सेवानिवृत्त सेवक आश्रुबा खंडागळे हे आवर्जून उपस्थित होते. या प्रसंगी प्रशालेतील सर्व शिक्षक सुनिल बावकर, संतोष ढोले, संतोष बोडके शिक्षकेत्तर पत्रकार शिवराम शिंदे,फुरडे लहू आदिंनी उपस्थीत राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
More Stories
शिवशक्ती सहकारी साखर कारखानाच्या वतीने सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांचा सत्कार
वाशी येथे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पदांसाठी अर्ज मागविले
हनुमंत पाटुळे यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्काराने सन्मानित