परंडा – मुख्यमंत्री सशक्तीकरण अभियान अंतर्गत शासनाच्या योजनेचा आम्हाला लाभ मिळाला आहे.सोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इतक्या मोठ्या समारंभात या लाभाचे सन्मानपत्रही मिळाले.खरेच आमच्यासाठी हा अविस्मरणीय क्षण आहे, असे सांगत महिला सक्षम होण्यासाठी या योजना चालू राहिल्या पाहिजे अशा भावना प्रत्येक लाभार्थी महिलांनी व्यक्त केल्या. प्रसंग होता धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील कोटला मैदानावर आयोजित महिला सशक्तिकरण अभियानाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्यासह मान्यवर आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना,युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच विविध विभागा अंतर्गत लाभधारक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी जिल्ह्यातील विविध योजनांच्या लाभार्थी महिलांमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी उषा पवार, जयश्री जाधव,अज्ञान कांबळे, वर्षा शेंडगे,लक्ष्मी टिळेकर, विठाबाई लोखंडे. कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचा लाभ मिळालेल्या राजश्री पाटील,रेशीम उद्योग विकास अंतर्गत तुती लागवडीसाठी चार लाख रुपयांचा लाभ मिळालेल्या छाया अंधारे, लखपती दीदी योजनेअंतर्गत शेती,दुग्ध व टेलरिंग व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या पुष्पा सावंत तसेच महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शेळीपालन व्यवसायासाठी अनुदानाचा लाभ मिळालेल्या रत्नमाला देशमुख या महिलांनी यावेळी शासनाचे आभार मानले.
More Stories
तंबाखूचा वापर हे अनेक प्रकारच्या कर्करोगाचे प्रमुख कारण – डॉ.शहाजी चंदनशिवे
भीम प्रतिष्ठानच्या वतीने तथागत गौतम बुद्ध यांची जयंती साजरी
रा.गे.शिंदे महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा