February 9, 2026

” आनंद नगरी ” कळंब येथील दिक्षीत परीवाराचा महालक्ष्मी देखावा

  • कळंब ( माधवसिंग राजपूत ) – गौरी गणपती सण म्हणजे आनंद उत्सव,एक महिना आधी सणाची तयारी चालु आसते विशेषतः घरातील महिला तन-मन लावुन महालक्ष्मी सणाच्या तयारीसाठी कमी पडणार नाही याची काळजी घेत आसतात. यामध्ये पुजा पाठ फराळाच्या सामानाची तयारी व तसेच महालक्ष्मी यांची मांडणी तसेच समोर आकर्षक सजावट तसेच देखावा यासाठीची ही तयारी करावी लागत असते.यात सामाजिक,शैक्षणिक,सांस्कृतिक,धार्मिक,देखावे मांडले जातात. कळंब शहरात गणेश उत्सवाच्या निमित्ताने आनंदनगरी उभारली जाते.मोठ्या आनंदाने बालगोपालांचा यात सहभाग असतो.कळंब येथील दीक्षित परिवाराने देखाव्याच्या स्वरूपात आनंदनगरीची मांडणी केली आहे. यामध्ये रहाट पाळणा, घसरगुंडी,गोल झुला,झोपाळा,वजन काटा,गाड्या,रेल्वे यांच्या छोट्या आकाराच्या खेळणी च्या प्रतिकृती (खेळणी ) तयार करू हलत्या स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे.यासाठी शुभांगी रोशन दीक्षित व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर यांनी यासाठी परिश्रम घेतले आहे.या कार्यात शुभांगी यांचे पती रोशन यांचे सहकार्य असते.रोशन उत्तम गायक आहेत. सासरे सतीश दीक्षित,सोने, चांदी, व्यापारी आहेत ,सासू नंदाबाई व सर्व कुटुंबीय महालक्ष्मी मांडणीसाठी प्रोत्साहन देत असतात. या देखाव्यात भगवान शंकराच्या पिंडीवर एक लोटा जल हा हलता देखावा महिलांचे लक्ष वेधून घेत होता.
error: Content is protected !!