ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांना भावपूर्ण श्रद्धांजली
परंडा – शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग असून,शिक्षणामुळेच माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त होतो.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या बळावर भारतीय संविधानाची निर्मिती केली आणि आज आपण स्वतंत्रपणे जगत आहोत.त्यांनी अठरापगड जातीतील दीनदलित, वंचित घटक,शेतकरी,महिला यांच्यासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे.सामाजिक, आर्थिक,शैक्षणिक क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केले.
रा.गे.शिंदे महाविद्यालय,परंडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील जाधव होते. या प्रसंगी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख,शारीरिक शिक्षण प्रमुख डॉ.कृष्णा,तसेच कनिष्ठ-वरिष्ठ विभागातील विद्यार्थी,प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले.अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी केला.कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण देशमुख यांनी मानले. याच कार्यक्रमात ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल भाऊ सुराणा यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाबद्दल श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव व रा.गे. शिंदे महाविद्यालय,परंडा यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली.
More Stories
जनसेवेची परंपरा कायम; नगरसेवक रत्नकांत ‘पापा’ शिंदे यांचा प्राध्यापकांकडून सत्कार
परंडा येथे ‘सोहळा दिव्यांगांचा,सोहळा सन्मानाचा’कार्यक्रम शेकडो दिव्यांगांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी विश्वरत्न डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घ्यावा — डॉ.शहाजी चंदनशिवे