- धाराशिव (जिमाका) – जिल्हयात विविध सण आणि उत्सवाच्या पर्श्वभूमीवर 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे,
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अपर जिल्हादंडाधिकारी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) व (3) अन्वये जिल्ह्यात 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू राहील.त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींनी या आदेशात नमुद असलेली कृत्ये सार्वजनिक परिसर किंवा त्याच्या जवळपास करण्यास बंदी घालण्यात आली आहे.हा आदेश कामावरील पोलीस अधिकारी,शासकीय कर्मचारी,विवाह,अंत्ययात्रा,धार्मिक कार्यक्रम,यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही.
- शारिरीक इजा होण्यास कारणीभूत ठरतील,सहज हाताळता येतील, अशा वस्तु बाळगता येणार नाही. कोणतेही दाहक पदार्थ,किंवा स्फोटकेजवळ बाळगता येणार नाहीत.सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे, निशाणी,घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तु जवळ बाळगता येणार नाही.
- पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणुक/मोर्चा काढता येणार नाही.
- अशा मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच पाच व पाचपेक्षा जास्त इसम जमण्यासाठी,सभा, मिरवणुका,मोर्चा काढणे,ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांना राहतील.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी