August 8, 2025

जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते उदघाटन

  • धाराशिव ( जिमाका) – आरोग्यासाठी विविध गुणसंपन्न असलेल्या आणि मानवी आहारात प्रमुख मेजवानी ठरणाऱ्या रानभाज्यांचा जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सव कृषि विभाग व आत्माच्या वतीने दि.२८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला.महोत्सवाचे उदघाटन पोलिस अधिक्षक संजय जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे प्रकल्प संचालक खंडेराव सराफ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिगंबर पेरके,केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक सचिन सुर्यवंशी,माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी शोभा कुलकर्णी,वॉटर संस्थेचे व्यवस्थापक कांतीलाल गिते,प्रकल्प उपसंचालक अभिमन्यू काशीद,कृषि विकास अधिकारी पी. जी.राठोड,उपविभागीय कृषि अधिकारी महादेव आसलकर, तालुका कृषि अधिकरी एस.पी.जाधव यांचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
    जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवास जिल्ह्यातील महिला शेतकरी गट,शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी व शेतकरी यांचा सहभाग होता.
    रानभाज्या व रानफळांची होती मेजवानी करटुले,हादगा,चिघळ, तांदुळाजा,लसूणपात,कुरडू,पाथरी,कढीपत्ता,आघाडा,अंबाडी,बांबू, केना,आळूचे पान,उंबर,पिंपळ, शेवगा,कपाळपुटी,गुळवेल,कोरफड,फांजी,वासनवेल,काटेमाठ,सराटा, ओवापान,कवठ यासह 80 हुन रानभाज्या व रानफळे विक्रीसाठी उपलब्ध होते.
    भाज्यांची मेजवानी नागरिकांनी या महोत्सवातून नागरिकांना मिळाली. तसेच यावेळी काही औषधी भाज्याही महोत्सवात होत्या.रानभाज्यापासून तयार केलेल्या विविध पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी व त्याचे गुणधर्म जाणून घेण्यासाठी शहरातील नागरिकांनी गर्दी केली होती.
  • *हजारो रुपयांची उलाढाल*
    मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या परिसरात जिल्हास्तरीय रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.या महोत्सवात जिल्हयातील विविध भागातून विविध प्रकारच्या रानभाज्या घेवून महिला-पुरुष सहभागी झाले होते.महोत्सवात जवळपास सर्वच भाज्या या सेंद्रीय पध्दतीने आणि माळरानावर येणाऱ्या भाज्या होत्या.यामुळे त्या खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यातुन हजारो रुपयांची उलाढाल झाली आहे.या महोत्सवात धाराशिव शहर आणि ग्रामीण भागातील 500 पेक्षा जास्त नागरिकांनी भेट देऊन रानभाज्या व रानफळांची माहिती घेतली.
    यावेळी रानभाज्यांची मांडणी,रेसिपी व सादरीकरण करणाऱ्या 25 उत्कृष्ट शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपनी व वैयक्तिक शेतकऱ्यांना पारितोषिक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

error: Content is protected !!