August 8, 2025

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीत भ्रष्टाचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

  • कळंब – सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर महाराष्ट्राचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला होता ज्याचे उदघाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.इतक्या जबाबदार व्यक्तींनी उदघाटन केलेल्या आराध्य दैवताचा पुतळा पडणे म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता ढासाळणे होय.
    छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कुठलीही काळजी घेतली नाही तसेच यात भ्रष्टाचार करून स्वतःची घरं भरणारा शिल्पकार आपटे, समंधित कॉन्ट्रॅक्टर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर महापुरुषांची बदनामी,पुतळा उभारणी करत असताना केलेला निष्काळजीपणा,धार्मिक भावना दुखावणे या गोष्टींच्या आधारे तात्काळ गुन्हा दाखल करून हे राज्य हा देश कायद्याच्या आधारे चालतं हे आम्हा सामान्य माणसाला दाखवून द्यावे अन्यथा लोकशाही मार्गाने दिनांक २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजल्यापासून पोलीस स्टेशन समोर समस्त शिवप्रेमीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी असे निवेदन कळंब येथील सकल मराठा समाजाच्या वतीने पोलिस निरीक्षक पोलीस स्टेशन यांना देण्यात आले आहे.

error: Content is protected !!