May 11, 2026

कळंब–ढोकी परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही – जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार

  • कळंब – आज दि.४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.१० ते १०.०० वाजण्याच्या सुमारास कळंब–ढोकी (जि. धाराशिव) परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपसदृश्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती.
    या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तातडीने नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेकडे तपासणीसाठी पाठविली. त्यानुसार NCS कडून करण्यात आलेल्या तपासणीत या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नाही,असे स्पष्ट करण्यात आले आहे.
    दरम्यान,जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की,कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच घाबरून जाऊ नये.
error: Content is protected !!