धाराशिव (जिमाका) – युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देवून त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना “ मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना ” चालू आर्थिक वर्षापासून सुरु करण्यात आली आहे.शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवक वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी या उददेशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत जिल्हयातील 4 हजार 552 युवकांना आतापर्यंत विविध विभागात नियुक्त्या देण्यात आल्या आहे.
या योजने अंतर्गत खाजगी क्षेत्रातील उद्योजकांना एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील.तर शासकीय,निमशासकीय आस्थापना उद्योग,महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के किंवा कमीत कमी एक याप्रमाणे उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येणार होते.
शासकीय व निमशासकीय कार्यालयासाठी 3 हजार 380 जागांसाठी ऑनलाईन तर 2 हजार 278 जागा ऑफलाईन अशा 5 हजार 758 जागांसाठी मागणी आली होती. जिल्हयातील उद्योग क्षेत्रातून 603 जागासाठी मागणी आली होती.तर सेवा क्षेत्रातून 136 जागांची मागणी आली होती.अशा तिन्ही क्षेत्रातून ऑफलाईनच्या माध्यमातून भरण्यासाठी 2 हजार 519 तर ऑनलाईन पध्दतीने भरण्यासाठी 3 हजार 978 अशा दोन्ही माध्यमातून 6 हजार 497 जागा भरण्यासाठी मनुष्यबळाच्या मागणी कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते.
शासकीय/निमशासकीय कार्यालयाच्या 149 आस्थापनांनी ऑनलाईन आणि ऑफलाईन,उद्योग/संस्थांच्या 20 आस्थापनांनी तर सेवा क्षेत्रातील 06 आस्थापनांनी मनुष्यबळाची मागणी केली आहे. जिल्हयातील विविध विभागात शासकीय कामाचा अनुभव घेण्यासाठी आतापर्यंत 7 हजार 787 युवकांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडे नोंदणी केली आहे.त्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने 5 हजार 409 व ऑफलाईन पध्दतीने 2 हजार 378 जणांनी नोंदणी केली आहे.1 ऑगस्टपासून आजपर्यंत 4 हजार 552 उमेदवारांना विविध विभागात नियुक्तया देण्यात आल्या आहेत.यामध्ये शासकीय/निमशासकीय विभागात ऑफलाईन 257 आणि ऑफलाईन 4 हजार 91 जणांना तर खाजगी क्षेत्रात 64 ऑनलाईन आणि 135 ऑफलाईन, तसेच सेवा क्षेत्रात 05 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवा वर्गाला शासकीय कामाचा अनुभव मिळत आहे.त्यासोबत विद्यावेतन मिळत असल्याने युवावर्गात आनंदाचे वातावरण आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला