August 8, 2025

लासरा बॅरेजसचे भुसंपादन आंदोलन;पंधरा दिवसांसाठी स्थगित

  • कळंब – लासरा बॅरेजसचे भुसंपादन त्वरित करून पाणी साठा करावा यासाठी सौंदणा, लासरा,आवाड शिरपुरा गावातील शेतकऱ्यांनी अर्धनग्न डुबकी मारो आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी तात्काळ बैठक घेऊन सौदणा (अंबा) येथील थेट खरेदीचे दर निश्चित केले.व उर्वरित गावांचे अवारड करण्याची प्रक्रिया तात्काळ करण्याचे आदेश दिले.त्यानंतर प्रशासनाने कार्यवाहीची प्रक्रिया सुरू केली. याबाबत आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र देऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे सुचविले होते.सर्व प्रक्रिया पूर्ण करून पाणी साठा करण्यासाठी प्रशासनाने पंधरा दिवसाची मूदत मागितली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंधरा दिवसाची मुदत मान्य केली आहे. परंतु पंधरा दिवसांत जर प्रक्रिया पूर्ण करून पाणी साठा केला नाही तर परत बेमुदत अर्धनग्न डुबकी मारो आंदोलन करण्याचा इशारा लेखी दिला आहे.

error: Content is protected !!