धाराशिव ( जिमाका ) – ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष व त्यावरील आहे व ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे,अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि ज्यांचे वय 60 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिक आहे व ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजार रुपये आहे अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना राज्य सरकारकडून राबविण्यात येत आहे. मन:शांतीसह आध्यात्मिक पातळी गाठण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.या योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे.योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुकास्तरावरील समाजकल्याण विभागाच्या वसतीगृहात अर्ज करण्याची “व्यवस्था करण्यात आली आहे.या दोन्ही योजनेचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावा.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे. ज्या नागरिकांचे वय 65 वर्ष व त्यावरील आहे व ज्यांचे कौटुंबिक उत्पन्न 2 लाख रुपयांच्या आत आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. ज्या ज्येष्ठ नागरिकांना वयोमानपरत्वे येणारे दिव्यांगत्व,अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक साधने/उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनस्वास्थ केंद्र,योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना राबविण्यात येत आहे. ज्यांचे वय वर्षे 60 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना व ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लक्ष 50 हजाराच्या आत आहे,अशा ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थस्थळांना जाऊन मन:शांती तसेच आध्यात्मीक पातळी गाठणे सुकर व्हावे यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु करण्यात आली आहे.अशा ज्येष्ठ नागरिकांनी दोन्ही योजनेसाठी समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त यांच्या अधिनस्त असलेल्या तालुकानिहाय वसतीगृहात अर्ज सादर करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.योजनेची माहिती, अर्जाचा नमुना व सोबतची प्रपत्रे कार्यालयासह http://samajkalyandharashiv.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. जिल्हयातील खालील ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना दोन्ही योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करता येणार आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह धाराशिव कर्मचारी बी.ए. नाईकनवरे (7083408388), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह नळदुर्ग कर्मचारी मोहन शिंदे (9422923043), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह लोहारा कर्मचारी शरद माळी (7350650720), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह कळंब कर्मचारी संजय कांबळे (9960489663), डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह परंडा कर्मचारी प्रभाकर शेळके (7020634706), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वस्तीगृह उमरगा कर्मचारी सुनंदा जेजुरे (9552446717), मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह वाशी कर्मचारी नासेरखान पठाण (8888142867), अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,मुरुम ता.उमरगा कर्मचारी दत्तात्रय कुंभार(9420831482),अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा,गोलेगाव ता.भुम कर्मचारी अण्णासाहेब शितोळे (9022039237),मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह तुळजापूर कर्मचारी पी.एस.राजपुत (8208566972) येथे अर्ज करावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते चॅटबोटचे उद्घाटन
आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय निवड चाचणी ११ ऑगस्टला