कळंब – बदलापूर जिल्हा ठाणे येथील चिमुकल्या मुलीवर नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे.या माणुसकीला लाजविणाऱ्या व काळीमा फासणाऱ्या घटनेचा सर्वत्र जाहीर निषेध होत असून दि २४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने बंदला प्रतिबंध केल्याने महाविकास आघाडी तील घटक पक्षाच्या वतीने राज्यातील प्रत्येक गावातील प्रमुख चौकात तोंडाला व दंडाला काळया पट्ट्या बांधून,नको आम्हाला पैशाची भीक,आम्हाला पाहिजे लेक सुरक्षित अशा घोषणा देत घटनेचा निषेध करीत आंदोलन केले. कळंब येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सकाळी ११.०० वाजता महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे,इंदिरा काँग्रेस व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने काळ्या पट्ट्या बांधून बदलापूर येथील घटनेचा निषेध करीत राज्यात माता,भगिनी असुरक्षित असून त्यांचे संरक्षण न करणाऱ्या सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी केली या आंदोलनात महाविकास आघाडीचे माजी आमदार दयानंद गायकवाड, प्रदीप मेटे,प्रा.दिलीप पाटील, सागर बाराते, श्याम खबाले ,विश्वजीत जाधव, हरीभाऊ कुंभार,विलास करंजकर, निशिकांत निर्फळ,ज्ञानदेव हौसलमल, सचिन गायकवाड ,शहाजान शिकलगार ,शिलानंद शिंनगारे ,भास्कर सोनवणे, चौधरी,अॕड,पृथ्वीराज देशमुख ,महंमद चाउस ,निर्भय घुले, निवृत्ती हौसलमल, महावीर गायकवाड, ज्योती सपाटे ,धनश्री कवडे, रुकसाना बागवान, सलमा सौदागर ,शोभा मस्के यांच्यासह कार्यकर्त्यांचा सहभाग होता.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड