मोहा – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या स्वप्नपूर्तीसाठी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एमकेसिएल व हायटेक कॉम्प्युटर एज्युकेशन यांच्या तर्फे भारतीय स्वातंत्र्यदिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेद्वारे भारतीय स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातील प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान तपासण्याचा व विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. हायटेक कॉम्प्युटरचे संचालक भैरवनाथ थोडसरे व सहकारी विक्रम वीर तसेच प्रा. श्रीमती प्रतिभा सावंत यांनी याकामी पुढाकार घेतला. या स्पर्धेसाठी मुख्याध्यापक तथा प्राचार्य संजय जगताप, उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा सुनील साबळे यांच्यासह सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना ज्ञान प्रसारच्या वतीने अभिवादन
बदलत्या शैक्षणिक युगात शिक्षकांची भूमिका व्यापक झाली – डॉ.अशोकराव मोहेकर
ज्ञान प्रसार विद्यालयात उत्साहात शिक्षक-पालक सभा संपन्न