कळंब – प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष,स्पर्धात्मक विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थी हे ब्रीदवाक्य घेवून शहरातील गणेश चित्र मंदिर रोड, बाबा नगर येथील इयत्ता १ ली ते १० वी पर्यंत विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी घेण्यात येणाऱ्या साक्षी कोचिंग क्लासेसचे संचालक तथा बालरोगतज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले डॉ.रमेश जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील ओम बाल रुग्णालयात व्यवस्थापनातील प्रमुख म्हणून तत्पर आरोग्य सेवा करीत असलेले आयु.राकेश घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी रुग्णालयात सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी बालरोगतज्ज्ञ डॉ.रमेश जाधवर,डॉ.रमेश कवडे,मित्रवर्य प्रथमेश लोमटे,शुभम थोरात,अभिजित साखरे आदींची उपस्थिती होती.
# धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले. यानिमित्त प्राचार्य सतिश मातने,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,मराठी विभाग प्रमुख प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशिका कोमल मगर,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक सचिन राऊत,आदित्य गायकवाड,विनोद कसबे व विद्यार्थी-विद्यार्थींची उपस्थिती होती.
# विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती कळंबच्या वतीने प्रा.अविनाश घोडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी चौकातील संदीप झेरॉक्स अँड लँमीनेशन या शॉपसमोर अभिष्टचिंतन करण्यात आले. यानिमित्ताने स्मारक समितीचे विश्वस्त माजी नगरसेवक सुनिल गायकवाड,रिपाई आठवले गटाचे तालुका अध्यक्ष शिवाजी शिरसट, लोजपा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ गायकवाड,शहराध्यक्ष नागेश धीरे,ज्ञानेश्वर मुळेकर,मित्रवर्य सागर पटेकर,सुरज गायकवाड व मेजर लखन हौसलमल आदींची उपस्थिती होती.
# कळंब शहरातील वि.दा.सावरकर चौकात दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग तालुकाध्यक्ष प्रा.अविनाश घोडके यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आले.
याप्रसंगी सा.साक्षी पावनज्योत शहर प्रतिनिधी तथा व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे तालुका उपाध्यक्ष महेश फाटक,अशोक चोंदे,शिवसेनेचे उत्तरेश्वर चोंदे व दादा माळी आदींची उपस्थिती होती. # “युथ पॉवर व्हाट्स अप” ग्रुपच्या मित्रांच्या वतीने प्रा.अविनाश घोडके यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी शहरातील लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे चौकात प्रसिध्द असणाऱ्या “मैत्री” हॉटेल मध्ये अभिष्टचिंतन करण्यात आले. याप्रसंगी सुरज गायकवाड,प्रविण पवार,मेजर लखन हौसलमल,सचिन जाधव,सागर उबाळे,सागर पट्टेकर,अमर कदम ,सुयोग गायकवाड सर व अजित हौसलमल यांची उपस्थिती होती.
More Stories
डिकसळ येथे माता रमाई जयंती उत्साहात साजरी
बस तासनतास थांबवून प्रवाशांना त्रास;संतप्त प्रवाशांची तक्रार
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन