लातुर – शहरातील श्रावस्ती बुद्ध विहारात भारतीय स्वातंत्र्यदिनी सकाळी ठिक:8:30वाजता पुज्य भिक्खु धम्मबोधींच्या हस्ते बुद्ध,भिमाला नि आण्णाभाऊ साठे,वामनदादांच्या प्रतिमांना वंदन करुन भारतीय राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण,मानवंदना देवुन राष्ट्रगीत घेतले.बुद्ध वंदना,धम्मग्रंथ वाचन,धम्मदेसना,प्रासंगीक विचार सचीव विलास घारगावकरांनी मांडले.सुमित्राबाई कांबळेंनी मिठाई वाटप केली.यानंतर दुपारी ठिक 2:00वाजता परिवर्तनवादी साहित्यिक विचार मंच तर्फे आयोजीत”निमंत्रीतांचे कविसंम्मेलन अध्यक्ष रमेश हाणमंते,जेष्ट साहित्यिक,लातुर,प्रमुख पाहुणे जेष्ठ कथाकार सतीश सुरवसे पुणे यांच्या प्रमुख ऊपस्थितीत सुरु झाले.तत्पुर्वी पाहुण्यांचे शाॅल,फुलहार,पुष्पगुच्छ,ट्राॅफी,सन्मानपत्र देवुन स्वागत केले.प्रास्ताविक स्वागताध्यक्ष विलास घारगावकरांनी केले.तर स्वागत समारंभाचे संचलन ऊपाध्यक्ष प्रा.प्रकाश आडसुळ यांनी केले.कवि संमेलनाचे संचलन विद्रोही कवि दिलीप गायकवाडांनी केले.प्रमुख पाहुण्यांनी आपले विचार मांडत “हाकमारी”ही कथा वाचन करत श्रोत्यांना खदखदा हासविले.नि परिवर्तनवादी साहित्यिकांचे प्रेरणास्थान साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे आणि महाकवि वामनदादाच आहेत.असे सांगीतले.यानंतर अध्यक्षीय समारोप जेष्टं साहित्यिक रमेश हाणमंतेंनी करत आण्णाभाऊ साठे आणि वामनदादा कर्डक हेच आपले ऊर्जास्थान आहेत.त्यांच्याच मार्गानी परिवर्तनवादी साहित्यिकांनी जावे असे आवाहन करत आपली कविता सादर केली.यावेळी निमंत्रीत कवि पांडुरंग वाघमारे,हसीम पटेल,सुरेखा भालेराव,तौसीन सय्यद,रामदास कांबळे,विवेक डोळसे,अँड.धम्मदीप बलांडे,देवदत्त सुर्यवंशी,अँड.सुनिता हिरवे,सुधाकर हातागळे,छगन घोडके,अँड.हाशीम पटेल,प्रा.पंढरी बनसोडे,राजेंद्र माळी, रामभाऊ यादव,मनोज संसारे,गोविंद गारकर,प्रा.गोविंद जाधव,छाया ओव्हाळ,महादेव सुर्यवंशी यांनी आपल्या कविता सादर केल्या.यावेळी संयोजनसमीती सदस्या रमाईकार कु.डाॅ.वैभवी घारगावकरनेही”मी लेक रमाची,नव्या दमाची..”खुपच छान कविता सादर केली.तर सचीव प्रदीप कांबळे,स्वागताध्यक्ष विलास घारगावकर,संचलनकर्ते कवि दिलीप गायकवाड यांनीही आपल्या कविता सादर केल्या.यावेळी प्रतिभा सावळेंनी,” भीमा तुझ्या मताचे…”हे सुंदर वामनदादाचे गीत सादर केले.तर आनंद डोणेरावनी वामनदादाचे गीत वाचन केले.यावेळी ऊपस्थित रसीक श्रोत्यांनी काव्य वाचनाला भरभरुन प्रतिसाद दिला.यात गोरेआज्जीने तर सर्वांना प्रेरक खुपच जुनी रचना सादर करत आचंबीत केले.तब्बल तिन तास ऊत्साही वातावरणात कविसंमेलनन चालले.प्रत्येक कविला स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र देवुन गौरविले,शेवटी आभार ऊपाध्यक्ष प्रदिप कांबळेंनी मानले तर ज्योती घारगावकरनी धम्मपालन गाथेनी कार्यक्रमाची सांगता केली.यासाठी संयोजन समीती सदस्य बिभीषन मानेंनीही परिश्रम घेतले. प्रति,संपादक साहेब तथा जिल्हा प्रतिनिधी,दै.वृत्तपत्र,लातुर यांना विनंती,सदरील वृत्त जनहितार्थ आपल्या नामांकित वृत्तपत्रातुन प्रसिद्ध करुन सहकार्य करून सहकार्य करावे.
More Stories
जिल्हा परिषद महिला परिचरांच्या न्यायासाठी ठिय्या आंदोलन यशस्वी!
एकशे सात सुरक्षा रक्षक झाले बेरोजगार;लातूरच्या शासकीय रुग्णालयाचा बेभरवशाचा कारभार!
जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होऊन कुटुंबाचा आधार बना – आमदार विक्रम काळे