कळंब – कऴंब येथील सेवा निवृत्त शिक्षण अधिकारी गजाननराव जगन्नाथराव कुलकर्णी पिंपळगावकर यांनी ज्ञानदानाचा वसा घेऊन कळंब तालुक्यातील ईटकुर या गावातून शिक्षक म्हणून कार्याला सुरुवात केली ,जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण ( Diet ) चे प्राचार्य म्हणून नियुक्ती व जिल्हा शिक्षणाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले सेवानिवृत्तीनंतरही त्यांचे समाज शिक्षण व मार्गदर्शनाचे काम सुरू आहे त्यांनी वयाची ८३ वर्ष पूर्ण केली आहेत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने व सरांचे विद्यार्थी राहिलेले ज्येष्ठ नागरिक महासंघाचे मराठवाडा प्रदेश सचिव डी .के .कुलकर्णी , ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ यांनी तसेच मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे, सेवानिवृत्त शिक्षक शिवाजी शिंदे ,माधवसिंग राजपूत यांनी कुलकर्णी सर व त्यांची पत्नी सौ.रत्नमाला कुलकर्णी यांचा पुष्पहार ,शाल व पेढे भरवुन सत्कार केला व उत्तम आरोग्य ,दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आभार कुलकर्णी यांच्या सूनबाई सौ.मनीषा कुलकर्णी यांनी मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले