कळंब ( राजेंद्र बारगुले ) – सा.साक्षी पावनज्योतच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त दि.१५ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ८.०० वाजता आर एम मीडिया कार्यालयात दैनिक लोकमत तालुका प्रतिनिधी बालाजी आडसूळ व दै.एकमत तालुका प्रतिनिधी सतिश टोणगे यांच्या वतीने संपादक सुभाष द.घोडके व कार्यकारी संपादक प्रा.अविनाश घोडके यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अभ्यासू व खमक्या पत्रकाराकडून झालेल्या सत्कारामुळे भारावून गेलो असल्याचे हृदयस्पर्शी उद्गार संपादक सुभाष घोडके यांनी काढले. या सत्कार प्रसंगी शुभम राखुंडे,महावीर वाघमारे आदींची उपस्थिती होती.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले