August 9, 2025

विशेष संक्षिप्त पुर्नरीक्षण मतदान यादी दावे हरकती स्वीकारण्यास सुरुवात

  • धाराशिव (जिमाका) – भारत निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुर्नरीक्षण कार्यक्रम घोषीत करण्यात आला आहे.त्यायानुसार 2 ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी सर्व मतदान केंद्र,तहसिल कार्यालय,उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच सर्व पदनिर्देशित ठिकाणी प्रसिध्द करण्यात आली आहे.यावर आता दावे हरकती स्विकारण्यास सुरुवात झाली आहे.
  • 6 ऑगस्टपासुन ते 20 ऑगस्टपर्यंत दावे व हरकती स्विकारण्यात येणार आहेत.यामध्ये नागरिकांकडून मतदार नोंदणीचे,मतदार यादीमधील दुरुस्ती तसेच नाव वगळणीचे अर्ज मागविण्यात येत आहेत.याच कालावधीमध्ये मुख्य निवडणूक अधिकारी यांनी निश्चित केलेले दोन शनिवार व रविवार या दिवशी विशेष मोहिमांचा कालावधी असणार आहे.
  • 29 ऑगस्ट रोजी दावे,हरकती निकालात काढणे,अंतिम प्रसिध्दीस आयोगाची परवानगी घेणे,डाटाबेस अद्यायवत करणे आदी कार्यक्रम आहेत.यानंतर 30 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी करण्यात येणार आहे.
  • नागरिकांनी आपले नाव मतदार यादीमध्ये नोंदवून घ्यावे.त्याचबरोबर मतदार यादीत नाव असल्याची खात्री करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सचिन ओंम्बांसे यांनी केले आहे.
error: Content is protected !!