August 9, 2025

उपशिक्षणाधिकारी यांची लोमटे विद्यालयास भेट

  • भाटशिरपुरा – कै. भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाट शिरपुरा येथे डी. एस.लांडगे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धाराशिव यांनी शाळेमध्ये विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबविण्याच्या संदर्भात शाळेत भेट दिली व गुणवत्ता विकास अभियानाच्या संदर्भात विविध प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले.
    तसेच शाळेमध्ये सर्व मुख्याध्यापक व शिक्षक व शिक्षक त्तर कर्मचारी यांची बैठक घेऊन विद्यार्थी गुणवत्ता विकास अभियान राबविण्याचा संदर्भात सर्व शिक्षकांना व्यवस्थित असे मार्गदर्शन करून सूचना देण्यात आल्या.
    यावेळी डी.एस.लांडगे यांचा शाळेच्या वतीने मुख्याध्यापक सुरेश टेकाळे यांनी त्यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी सचिव बाळकृष्ण धस,एस.जी.सूर्यवंशी,एच. ए. पान ढवळे, एस. एस. डिकले, बी. व्ही.ओव्हाळ, नवनाथ पांचाळ, व्ही.एम.शिंदे, व्ही.एस.चाळक व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
error: Content is protected !!