शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.05 ऑगस्ट रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 161 कारवाया करुन 1,20,000 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: आरोपी नामे-कांताबाई धनाजी राठोड, वय 62 वर्षे, रा. कौडगाव तांडा ता. जि. धाराशिव या दि.05.08.2024 रोजी 20.30 वा. सु. कौडगाव तांडा येथे अंदाजे 900 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 6 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे-किशोर श्रीरंग व्हणाळे, वय 36 वर्षे, रा. गुगळगाव ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.05.08.2024 रोजी 18.30 वा. सु. आपल्या शंभो किराणा दुकाणा समोर गुगळगाव येथे अंदाजे 1.050 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 15 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
लोहारा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.05.08.2024 रोजी 19.40 वा. सु. लोहारा पो.ठाणे हद्दीत जेवळी बाजार चौक येथे बंध पान टपरीच्या बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- आप्पासाहेब गिडाप्पा दंडगुले, वय 29 वर्षे, रा. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव, पिंटु हरीबा जाधव, वय 35 वर्षे, रा. जेवळी ता. लोहारा जि. धाराशिव हे दोघे 19.40 वा. सु. जेवळी बाजार चौक येथे बंध पान टपरीच्या बाजूस मुंबई मेन बाजार मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,110 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो.ठा.च्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.05.08.2024 रोजी 19.45 वा. सु. धाराशिव शहर पो.ठाणे हद्दीत धाराशिव ते तुळजापूर रोडलगत देशपांडे स्टॅण्ड जवळील सरकार नावाचे पानटपरी समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे- आकाश श्रीकांत काटवटे, वय 29 वर्षे, रा. झोरी गल्ली ता. जि. धाराशिव, पिंटु हे 19.45 वा. सु. धाराशिव ते तुळजापूर रोडलगत देशपांडे स्टॅण्ड जवळील सरकार नावाचे पानटपरी समोर मिलन नाईट मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 730 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो.ठा.च्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
वाशी पोलीस ठाणे : आरोपी नामे-अजीत अब्दुला पठाण, वय 20 वर्षे, रा. कसबा पेठ भुम ता. भुम जि. धाराशिव, सफीन सौदागर ईकरार, वय 22 वर्षे, रा. पेठ बार्शी ता. बार्शी जि. सोलापूर यांनी दि.04.08.2024 रोजी 20.45 ते 22.00 वा. सु. सरमकुंडी फाटा व पारडी फाटा येथे आयशर टेम्पो क्र एमएच 24 एयु 2926 व पिकअप क्र एमएच 25 ए.जे. 5309 या दोन्ही वाहना मध्ये म्हैशी भरुन वाहनासह असा एकुण 10,95,000₹ किंमतीच्या म्हैशी वाहनामध्ये दाटीवाटीने कोंबून निर्दयतेने जनावरांचे सुरक्षीततेची खबरदारी न घेता दोरीने आवळून बांधून जनावरे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करीत असताना वाशी पो. ठाणेच्या पथकास मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध कायदा कलम 3, 11(1), 11 (1) (ए),11 (1) (एच), 11(1)(आय) प्राण्याचा परिवाहन अधिनियम कलम 47, 54,56 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
भुम पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- सुमंत रामेश्वर जाधवर, वय 38 वर्षे, रा. तांबेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 35,000₹ किंमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एए 2723 ही दि. 25.07.2024 रोजी 15.30 वा. सु. झोलापूर मारुती मंदीर जवळ भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सुमंत जाधव यांनी दि.05.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: फिर्यादी नामे- सचिन हरिकिसन काबरा, वय 44 वर्षे, रा. सोनार गल्ली मुरुम ता. उमरगा जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची बजाज सीटी 100 कंपनीची काळा व राखाडी कलरचा पट्टा असलेली मोटरसायकल क्र एमएच 12 सीक्यु 6403 ही दि. 02.08.2024 रोजी 23.00 ते दि. 03.08.2024 रोजी 09.00 वा. सु. उमरगा येथील आरोग्य नगरी उमरगा येथील प्रा.दत्तात्रय लोभे यांचे घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- सचिन काबरा यांनी दि.05.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
उमरगा पोलीस ठाणे: आरोपी नामे- गोविंद व्यकंट जेवळे,अनिता गोविंद जेवळे, मनोज ज्ञानदेव जेवळे,वैभव गोविंद जेवळे, गजानन दत्तात्रय जेवळे, वैशली गजानन जेवळे, योगेश दिगंबर जेवळे,दयानंद गजानन जेवळे, इतर दोन इसम सर्व रा.एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.04.08.2024 रोजी 15.30 वा. सु. एकुरगा शिवारातील शेत गट 47/1 मध्ये फिर्यादी नामे-श्रीधर किसन जेवळे, वय 30 वर्षे, रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांना व त्यांची आई यांना नमुद अरोपींनी शेतीच्या वादाचे करणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन फिर्यादीचे राहते घराचे पत्रयाचे शेड पाडून व जनावरांच्या कोट्याला आग लावून पेटवून देवून फिर्यादीचे अंदाजे 1,50,000₹ किंमतीचे नुकसान केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- श्रीधर जेवळे यांनी दि.05.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 326(जी), 115(2),352,351(2)(3), 324, (4)(5), 189(2) 191(2), 193(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: आरोपी नामे-अंकुश बळीराम देवकर, तानाजी बळीराम देवकर, बळीराम शेषेराव देवकर सर्व रा. कारला ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.04.08.2024 रोजी 17.00 वा. सु. काक्रंबावाडी शिवारातील शेतात फिर्यादी नामे-भरत हरी माने, वय 26 वर्षे, रा. काक्रंबावाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी विक्री केलेल्या बैलाचे राहीलेले पैसे देण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने मारहाण करुन जखमी केले. व फिर्यादीची आई या भांडण सोडवण्यास आल्या असता त्यांनाही नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- भरत माने यांनी दि.05.08.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118 (1), 115(2),352, 324, (4), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी