कळंब – कळंब तालुक्यातील मौजे मंगरूळ येथील तलाठी डि.व्ही. सिरसेवाड पाटील हे नेहमीच आपल्या कामात अग्रेसर असतात. नुकतेच महसूल विभागाचा 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट महसूल सप्ताह सुरू असून महसूल सप्ताह मध्ये लोकांचे प्रलंबित कामाचा जागेवरच निपटारा करण्यात आला. त्यात प्रलंबित फेरफार, वारस फेरफार, सातबारा, किरकोळ दुरुस्ती, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा डाटा दुरुस्ती, अतिक्रमण मुक्त शेत रस्ते, इतर सर्व प्रश्न निकाली काढले. तसेच दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी महसूल सप्ताह निमित्त “स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय”कार्यक्रम घेऊन अपले कार्यालय स्वच्छ करून आपले दप्तर अद्यावत करून शेतकऱ्यांना विविध माहिती पुस्तके देण्यात आली. त्यामुळे प्रथमच एवढ्या तळमळीने एखादा कर्मचारी आपल्या गावात काम करतो.व सुट्टीच्या दिवशी ही आपल्याला सेवा मिळते त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.तर ग्रामस्थांमधून तलाठी डि.व्हि. शिरसेवाड पाटील यांचे अभिनंदन होत आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात