August 9, 2025

महात्मा बसवेश्वरमध्ये ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेचा जिल्हा मेळावा संपन्न

  • लातूर – उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये “घरगुती पद्धतीने बदल करून” सुरु असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाची जनजागृती करण्यासाठी महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर येथे ‘स्वामुक्टा’ प्राध्यापक संघटनेचा लातूर जिल्हा मेळावा संपन्न झाला.
    या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी स्वामुक्टाचे प्रसिद्धी प्रमुख प्रभारी प्राचार्य डॉ.संजय गवई हे होते तर विचारमंचावर संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.सूर्यकांत जोगदंड, उपाध्यक्ष डॉ.डी.एन.मोरे, सचिव डॉ.विजय भोपाळे, कोषाध्यक्ष डॉ.दिलीप पाईकराव,डाॅ. किशोर हुगे,जिल्हा सचिव डाॅ.अमोल लाटे, आधिसभा सदस्य डॉ.विष्णु पवार व डॉ.महेश बेंबडे, जिल्हा कोषाध्यक्ष डाॅ.धोंडिबा भुरे, डॉ.मनोजकुमार सोमवंशी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ.गोपाळ मोघे, डॉ.रावसाहेब इंगळे, डॉ.पांडुरंग मगर, डॉ.बालाजी सूर्यवंशी, डॉ.भास्कररेड्डी नल्ला आणि डॉ.विजयकुमार सोनी यांची उपस्थिती होती.
  • कार्यक्रमाच्या प्रारंभी महाराष्ट्र महाविद्यालय,निलंगा येथील माजी रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रो.जयराज डावळे यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर सर्व मान्यवरांनी जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला विनम्रपणे अभिवादन केले.
    यावेळी केंद्रीय अध्यक्ष डॉ.सूर्यकांत जोगदंड म्हणाले की, संघटनेने प्राध्यापकांच्या विविध प्रश्नांवर आजपर्यंत वेगवेगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिले आहेत. मौलिक हक्क व लाभ याबाबत सविस्तर मांडणी केली. तसेच आगामी काळात प्राध्यापकांच्या समोरील आव्हाने व त्यासाठी संघटनेची गरज याची विस्तृत माहिती देवून उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये “घरगुती पद्धतीने बदल करून” सुरु असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात महाराष्ट्र प्राध्यापक महासंघाने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनात सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन सुद्धा त्यांनी यावेळी केले.
    यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष डॉ.डी.एन.मोरे यांनी उच्च शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून भारतीय संविधानातील तरतुदींमध्ये “घरगुती पद्धतीने बदल करून” युजीसी अधिनियम २०१८ मध्ये मोडतोड करून तयार केलेले प्रश्न, एम.फील प्राध्यापकांच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने स्वयं स्पष्ट निकाल देऊन देखील त्यांना पदोन्नतीचे लाभ मिळण्यापासून वंचित ठेवण्याचा सुरू असलेला सावळा गोंधळ, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये निर्माण होणारे प्रश्न या अनुषंगाने अभ्यासपूर्ण विवेचन केले.
    यावेळी सचिव डॉ.विजय भोपाळे यांनी दि.१६ ऑगस्ट रोजी स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेड येथे होणाऱ्या विराट मोर्चात सर्व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.
    याप्रसंगी डॉ.दिलीप पाईकराव, डॉ.विष्णु पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
    यावेळी जिल्हा सचिव डॉ.अमोल लाटे आपल्या प्रस्ताविकात म्हणाले की, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या १८ जुलै २०१८ रोजीच्या अधिसुचनेची जशास तशी अंमलबजावणी करावी, पीएच.डी व एम.फील करिता देय असलेल्या प्रोत्साहनपर वेतनवाढी पुर्ववत कराव्यात, सहयोगी प्राध्यापक पदावरील पदोन्नतीचे लाभ मुलाखत दिनांकाऐवजी पात्रता दिनांकापासून द्यावेत, एम.फिल.धारक प्राध्यापकांना पदोन्नतीचे लाभ तात्काळ देऊन त्यांचा छळ थांबवावा. दि.०१ नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत आलेल्या सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. पूर्णवेळ प्राध्यापकांची रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी याबाबत संघटनेने जाहीर केलेल्या कृती कार्यक्रम आणि प्रमुख मागण्याची सविस्तर माहिती सर्वाना दिली.
    यावेळी “शिक्षण विश्व” आंदोलन विशेषांक – ०२ चे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
    तसेच जिल्हा कोषाध्यक्ष प्रा.डॉ.धोंडीबा भुरे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेडची नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली त्याबद्दल त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला.
    आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.संजय गवई यांनी संघटना व संघटनेची ध्येय धोरणे याबाबत सभागृहाला संबोधित केले.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोषाध्यक्ष डॉ.धोंडिबा भुरे यांनी केले. तर आभार डॉ.विजयकुमार सोनी मानले.
    या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.विलास लुटे, प्रा.विष्णू तातपुरे, आनंद खोपे, खुब्बा यांच्यासह कुस्ती प्रशिक्षण केंद्रातील सर्व खेळाडूंनी परिश्रम घेतले.
    या मेळाव्याला लातूर जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
error: Content is protected !!