August 8, 2025

अल्पसंख्याक विभाग कळंब तालुका अध्यक्ष पदी सलमानखान पठाण

  • धाराशिव -राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय अल्पसंख्यांक विभाग पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उत्साहात संपन्न झाली. या बैठकीमध्ये राज्यातील व जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.यावेळी प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब यांच्याकडे तुळजापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने लढवावी अशी मागणी अल्पसंख्यांक विभाग जिल्हाध्यक्ष तौफिक शेख व पदाधिकाऱ्यांनी केली. यावेळी जावेद हबीब यांनी या मागणीचा विचार राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार व जयंत पाटील यांच्यासमोर मांडणार अशी गवाही दिली.
    या बैठकीत जिल्ह्य़ातील पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
    राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग शरदचंद्र पवार कळंब तालुका अध्यक्ष पदी सलमानखान पठाण यांची निवड करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष जावेद हबीब साहेब
    परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष जीवनराव गोरे, प्रदेश सचिव मसूद भाई शेख, जिल्हाध्यक्ष तोफीक भाई शेख,प्रदेश सरचिटणीस प्रतापसिंह पाटील,जिल्हा उपाध्यक्ष खादर खान पठाण वाजिद पठाण,युवक जिल्हा अध्यक्ष शेखर घोडके सह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
error: Content is protected !!